नाशिकचे ऐतिहासिक श्री काळाराम, सीतागुंफा, कपालेश्वर मंदिर दर्शनासाठी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 04:07 PM2020-03-17T16:07:13+5:302020-03-17T16:10:26+5:30
नाशिक : संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मंदिर मठ व धार्मिक स्थळांवर दर्शनाला येणाऱ्या भाविकांमध्ये संसर्ग होण्याची दाट शक्यता असल्याने कोरोनाचे रुग्ण वाढू नये यासाठी नाशिकचे ऐतिहासिक श्री काळाराम मंदिर मंगळवारी (दि.१७) दुपारपासून बंद करण्यात आले, तर सीतागुंफा मंदिरही भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले. तर त्यानंतर श्री कपालेश्वर मंदिरही बंद करण्यात आले आहेत.

नाशिकला देवदर्शनासाठी परराज्यांतून शेकडोंच्या संख्येने भाविक दैनंदिन येत असतात पंचवटीत आलेले भाविक श्री काळाराम व सीतागुंफा मंदिर बघण्यासाठी मोठी गर्दी करतात. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण भारतभर कोरोना आजाराचे रुग्ण आढळून येत आहे. गर्दीच्या तसेच सार्वजनिक ठिकाणी आजाराचे विषाणू पसरून संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासकीय पातळीवर विविध उपाययोजना राबविल्या जात असून, खबरदारीचा उपाय म्हणून मंदिर मठ तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये याबाबत शासनाने आदेश दिले आहे. त्यानुसार भाविकांची गर्दी होणा-या मंदिरांनादेखील सोमवारी प्रशासनाने नोटिसा बजावल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर मंगळवार (दि. १७) सकाळी पंचवटीतील सीतागुंफा मंदिर, तर दुपारच्या सुमाराला काळाराम मंदिर बंद करण्यात आले आहे.
भाविकांची होणारी गर्दी व संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाला सहकार्य म्हणून ३१ मार्चपर्यंत सीतागुंफा मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेत मंगळवारी सकाळपासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद केल्याची माहिती मंदिराचे महंत कविंद्रपुरी गोसावी यांनी तर काळाराम मंदिराचे विश्वस्त मंदार जानोरकर, धनंजय पुजारी यांनी दिली .