नदीकाठावरील सहाशे रोहित्र बंद

By admin | Published: August 4, 2016 01:59 AM2016-08-04T01:59:44+5:302016-08-04T02:09:57+5:30

सुरक्षिततेच्या उपाययोेजना : निम्मे रोहित्र सुरू; विद्युत खांबही वाकले

Closed six hundred rooftops on the river bank | नदीकाठावरील सहाशे रोहित्र बंद

नदीकाठावरील सहाशे रोहित्र बंद

Next

नाशिक : गेल्या ४८ तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदीकाठचा परिसर आणि रहिवासी क्षेत्रात साचलेल्या पाण्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव शहर परिसरातील ६११ रोहित्र बंद करण्यात आले होते. सकाळपासून टप्प्याटप्प्याने रोहित्र सुरू करण्यात येत असून सायंकाळपर्यंत सुमारे पाचशे रोहित्र सुरू करण्यात आल्याची माहिती वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आल्याने या पुरात नदीकाठी असलेले सुमारे ११२ रोहित्र पाण्याखाली आल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव ही सर्व रोहित्रे कालपासून बंद करण्यात आली होती. तसेच नाशिकरोड, भगूर, पळसे, लहवित पसरातील नदीकाठावरील सुमारे १२५ रोहित्र पाण्याखाली असल्याने ही रोहित्र देखील बंद करण्यात आली होती. त्याचप्रमाणे ज्या सोसायटी, कॉलनी परिसरातील रहिवासी क्षेत्रात अजूनही पाणी आहे असे रोहित्र बंद करण्यात आलेली आहे. शहरातील ज्या भागात विद्युत तारा निखळल्या किंवा खांब वाकल्याने वीजप्रवाह खंडित झाला होता अशा ठिकाणचा प्रवाह पूर्ववत करण्यात आला आहे.
विशेषत: गोदाकाठासह पंचवटीतील ३२९ रोहित्र प्रथम बंद करण्यात आले होते. त्यामुळे पंचवटी परिसरातील बऱ्याच परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता. सकाळी बंद करण्यात आलेले रोहित्र सायंकाळी पाच वाजेनंतर टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली. रोहित्रात पाणी शिरल्यामुळे अनेक रोहित्रदेखील नादुरुस्त झाली. त्यामुळे युद्ध पातळीवर रोहित्र दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. रोहित्राची दुरुस्ती आणि पुनर्स्थापित करण्याची कारवाई दिवसभर सुरू असली तरी काल दुपारी खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा सायंकाळपर्यंतही पूर्ववत झाला नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. त्यातच वीज कंपनीतील अधिकारी दूरध्वनीला दाद देत नसल्यानेही संताप व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, शहर परिसरातील ३६ केव्हीचे आठ, ११ केव्हीचे तीन, आणि एलटीचे पाच विद्युत खांब पडले आाहेत. तर सहा ठिकाणी विद्युत रोहित्र नादुरुस्त झाले आहेत. नाशिकरोड विभाग दोनमधील १२५ रोहित्र पाण्याखाली आल्यामुळे ही रोहित्र बंद करण्यात आली आहेत. लहवित, भगूर, सामनगाव, कोटमगाव, चाडेगाव परिसरातील रोहित्र बंद करण्यात आले आहेत. विशेषत: दारणा नदीकाठचे रोहित्र अजूनही पाण्याखालीच असल्याने सदर रोहित्र बंदच ठेवण्यात आली आहेत. उर्वरित १३० रोहित्र सुरू करण्यात आले आहेत. नाशिकरोड परिसरातील नऊ ठिकाणी रोहित्रांमध्ये बिघाड झालेला आहे, तर परिसरात एकूण ३१० पोल पडले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Closed six hundred rooftops on the river bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.