शहरात मंगळवारी पाणीपुरवठा बंद

By admin | Published: November 21, 2015 11:38 PM2015-11-21T23:38:36+5:302015-11-21T23:39:09+5:30

शहरात मंगळवारी पाणीपुरवठा बंद

Closed water supply in the city on Tuesday | शहरात मंगळवारी पाणीपुरवठा बंद

शहरात मंगळवारी पाणीपुरवठा बंद

Next

नाशिक : गंगापूर धरणावरील विविध कामांसाठी वीजपुरवठा बंद करण्यात येणार असल्याने येत्या मंगळवारी (दि. २४) संपूर्ण शहरात दुपारी आणि सायंकाळचा, तर बुधवारी (दि.२५) सकाळी १० वाजेपर्यंत पाणीपुरवठा होणार नसल्याचे मनपाने कळविले आहे. गंगापूर धरणातील पंपिंगस्टेशन येथे नवीन एनर्जी मीटर बसविणे, सबस्टेशनविषयक कामे करणे, तसेच शहरातील पाणीपुरवठा वितरण वाहिन्यांच्या दुरुस्त्या करणे, गळती बंद करणे आदि विविध कामे करण्यासाठी महावितरणचा वीजपुरवठा खंडित करावा लागणार आहे. त्यामुळे मंगळवार, दि. २४ रोजी संपूर्ण शहराचा दुपारचा व सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. दि. २५ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत, तर दुपारी व सायंकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने कमी प्रमाणात होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Closed water supply in the city on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.