पाणीपुरवठा योजना बंद

By admin | Published: February 3, 2017 12:43 AM2017-02-03T00:43:50+5:302017-02-03T00:44:04+5:30

राजापूर : रोहित्र जळाल्याचा परिणाम

Closed water supply scheme | पाणीपुरवठा योजना बंद

पाणीपुरवठा योजना बंद

Next

 ममदापूर : येवला तालुक्यातील नेहमीच दुष्काळी म्हणून उत्तर-पूर्व भागातील लोकांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असतो. परंतु सध्या विहिरीमध्ये पाणी असूनदेखील आठ दिवसांपासून गावातील नळाला पाणी नाही. मागील तीन महिन्यांत राजापूर येथील गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीला विद्युत पुरवठा करणारे रोहित्र तीन वेळा जळाले आहे.
येथील रोहित्र हे वारंवार जळते यामुळे गावासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीसाठी स्वतंत्र डीपी बसवण्यात यावी, अशी मागणी होत आहे. मोटार कनेक्शन जोडणी १५ एच असून, रोहित्र हे ६३ अश्वशक्तीचे आहे. तरी वारंवार रोहित्र जळण्यामागील कारण शोधणे गरजेचे असून, त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
वर्षातून दोन ते तीन महिने नळाला पाणी नसूनदेखील ग्रामपंचायत संपूर्ण वर्षाची पाणीपट्टी भरून घेते. नियमतिपणे नळाला पाणी सोडणे गरजेचे आहे.(वार्ताहर)

Web Title: Closed water supply scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.