तोट्यातील जिल्हा बॅँकेच्या २३ शाखा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 12:36 AM2018-06-08T00:36:21+5:302018-06-08T00:36:21+5:30
नाशिक : नाशिक जिल्हा बॅँकेची ढासळणारी आर्थिक परिस्थिती व वाढत जाणारा प्रशासकीय खर्च पाहता प्रशासनाने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २३ शाखांमधील कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला असून, ज्या शाखा बंद करण्यात येतील त्या नजीकच्या शाखेशी जोडून सभासद, खातेदारांना दिलासा देण्यात येणार आहे. जिल्हा बॅँकेच्या इतिहासात ही पहिलीच घटना असून, नोटाबंदीचा हा फटका असल्याचे मानले जात आहे.
नाशिक : नाशिक जिल्हा बॅँकेची ढासळणारी आर्थिक परिस्थिती व वाढत जाणारा प्रशासकीय खर्च पाहता प्रशासनाने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २३ शाखांमधील कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला असून, ज्या शाखा बंद करण्यात येतील त्या नजीकच्या शाखेशी जोडून सभासद, खातेदारांना दिलासा देण्यात येणार आहे. जिल्हा बॅँकेच्या इतिहासात ही पहिलीच घटना असून, नोटाबंदीचा हा फटका असल्याचे मानले जात आहे.
जिल्हा बॅँकेच्या प्रशासनाने गेल्या काही वर्षांपासून बॅँकेच्या २१२ शाखांची प्रत्येक शाखेनिहाय होणारे व्यवहार व त्यातून बॅँकेला मिळणारा लाभ तसेच प्रशासकीय खर्च याचा ताळमेळ घेण्यास सुरुवात केली होती. त्यातून पहिल्या टप्प्यात २३ शाखांमध्ये अल्प व्यवहार होत असल्याचे व उलट प्रशासकीय खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, कार्यालयीन खर्चाचे प्रमाण पाहता सदरच्या
शाखा तोट्यात असल्याचे आढळून आले होते. त्यानुसार प्रशासनाने २३ एप्रिल रोजी संचालक मंडळाकडे सदरच्या बॅँक शाखा कायमस्वरूपी बंद करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावावर संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येऊन त्यास मंजुरी देण्यात आली व ३० जूनपर्यंत सदरच्या शाखा बंद करण्याचे आदेश ३० मे रोजीच काढण्यात आले आहे. जिल्हा बॅँकेच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असून, शाखा बंद करण्याच्या या निर्णयामुळे बॅँकेच्या कर्मचाºयांमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष करून नोटाबंदी नंतर रखडलेली कर्जवसुली या गोष्टींमुळे बॅँक आर्थिक अडचणीत सापडल्याचे मानले जात आहे. याशिवाय ज्या गावातील शाखा बंद करण्यात येत आहे तेथील सभासद व खातेदारही हवालदिल झाले आहेत. तथापि, सभासदांचे हित लक्षात घेता बॅँकेच्या उपरोक्त निर्णयात बदल होण्याची शक्यता बॅँकेच्या पदाधिकाºयांनी व्यक्त केली आहे.
बंद होणाºया शाखा व त्यांचे (कंसात) विलिनीकरण
दरी (मखमलाबाद), देवळालीगाव (नाशिकरोड), पळसे शुगर (शिंदे), गांधीनगर (देवळाली नाका), लहवित कक्ष (भगूर), नाशिक नगरपालिका (आग्रारोड नाशिक), मॉडेल कॉलनी (आनंदवल्ली), चास (नांदूरशिंगोटे), मºहळ बू. (वावी), बारागाव प्रिंपी (मार्केट यार्ड सिन्नर), पिंपळस (भाऊसाहेब नगर), वाकद (शिरवादे वाकद), गोंदेगाव (विंचूर), लासलगाव (मार्केट यार्ड लासलगाव), मुखेड गोंडेगाव (पिंपळगाव बसवंत), जबे्रश्वररोड येवला (मार्केट यार्ड येवला), विराणे (वडनेर खाकुर्डी), पाडळदे (सायणे बू.), मालेगाव कॅम्प (मार्केट यार्ड मालेगाव), टिळकरोड मालेगाव (वसंतवाडी मालेगाव), तळवाडे (रावळगाव), सटाणा शहर (सटाणा), सांजेगाव (वाडीवºहे) बॅँकेची आर्थिक परिस्थिती व हित लक्षात घेऊन निर्णय घेण्यात आला आहे. बंद करण्यात येणाºया शाखा तोट्यात चालत होत्या तसेच तेथे व्यवहारही कमी होत असल्याने प्रशासकीय खर्च बॅँकेला परवडणारा नव्हता याचा सारा विचार करण्यात आला आहे. बॅँकेचे सभासद, खातेदारांची अडचण होऊ नये यासाठी नजीकच्या शाखेमार्फत त्यांना सुविधा देण्यात येणार आहे. साधारणत: जून महिन्यात शाखा बंदची कार्यवाही पूर्ण होईल.
- केदा अहेर,
जिल्हा बॅँक अध्यक्ष