येवल्यातील मका खरेदी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 12:13 AM2018-02-16T00:13:38+5:302018-02-16T00:17:14+5:30
येवला : शासकीय आधारभूत किंमत योजनेअंतर्गत सुरू असलेली मका खरेदी योजना गुदामाअभावी पुन्हा बंद झाली आहे. तहसील कार्यालयाकडून मका साठवणीसाठी गुदाम उपलब्ध झाल्यावर, ज्या मका उत्पादक शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली अशा शेतकºयांची मका खरेदी पूर्ववत सुरू होणार असल्याचे तालुका खरेदी-विक्र ी संघाचे अध्यक्ष भागूनाथ उशीर यांनी सांगितले. मका खरेदीसाठी उपलब्ध झालेली गुदामे पूर्ण क्षमतेने भरल्याने मका खरेदी पुन्हा रखडली आहे. खरेदीच्या प्रतीक्षेत असलेला मका आणखी किती दिवस सांभाळायचा असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.

४ डिसेंबर २०१७ला सुरू शासकीय मका खरेदी योजनेअंतर्गत एमआयटी कॉलेज धानोरा गोशाळा मैदान गुदाम, एरंडगाव, पिंपळगाव जलाल याठिकाणी उपलब्ध गुदामामध्ये मका खरेदी सुरू होती, परंतु ही खरेदीदेखील ७ फेब्रुवारीपासून बंद आहे. पाचही गुदामे पूर्ण क्षमतेने भरल्याने तहसील कार्यालयाकडून गुदाम उपलब्ध होईपर्यंत मका साठवणूक खरेदी तात्पुरत्या स्वरूपात बंद आहे.
१४३९ आॅनलाइन नोंदणीधारक शेतकºयांपैकी ५०० क्रमांकापर्यंतच्या शेतकºयांना माल विक्रीसाठी आणण्याच्या सूचना दिल्या असून ४२४ शेतकºयांनी मका विक्र ी केली आहे. अद्याप १०१५ शेतकरी प्रतीक्षेत आहे.
गुदामाअभावी केंद्र बंद होऊ नये याकरिता तालुका खरेदी-विक्री संघाने आठ दिवसांपूर्वीच गुदाम उपलब्ध मागणीचे निवेदन येवला तहसील कार्यालयात दिले. आता सावरगाव येथील केवळ एक हजार क्विंटल क्षमता असणारे गुदाम उपलब्ध होण्याच्या मार्गावर आहे. केंद्र लवकर सुरू करण्यात यावे, अशी मागणी येवला तालुक्यातील शेतकरी वर्गाकडून होत आहे.शासकीय केंद्रावर कलखासगी बाजारभावापेक्षा शासकीय आधारभूत किमतीने खरेदी केंद्रावर मका
विक्र ीला किमान चारशे रु पये प्रतिक्विंटल भाव अधिक मिळत असल्याने शेतकºयांचा शासकीय आधारभूत केंद्रावर मका विक्र ीचा कल आहे, परंतु शासनाकडून या विक्र ी झालेल्या मालाचे पैसे मिळत नाही, मकादेखील विकला जात नाही यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. तालुक्यात यंदा मक्याचे विक्र मी उत्पादन झाले असून, स्थानिक व्यापाºयांकडे १००० ते ११२५ रु पये पर्यंत सरासरी भाव मिळत आहे. या तुलनेत तालुका खरेदी-विक्र ी संघामार्फत होणाºया शासकीय आधारभूत खरेदीत प्रतिक्विंटल १४२५ रु पयांचा भाव मिळत असल्याने शेतकºयांची धाव या शासकीय मका खरेदी केंद्राकडे आहे.मका साठवणूक गुदामासाठी तहसील कार्यालयाकडे मागणी केली असून, गुदाम उपलब्ध होताच त्वरित मका खरेदी केंद्र सुरू होईल.
- भागूनाथ उशीर,
अध्यक्ष, खरेदी-विक्र ी संघ येवला
आॅनलाइन नोंदणी करून दीड महिना लोटला परंतु धिम्या गतीने मका खरेदी चालू होती तीदेखील बंद झाली आहे. तालुक्यात ४ ते ५ ठिकाणी केंदे्र सुरु करून किमान नोंदणी झालेली मका खरेदी लवकर करा. आता खासगी व्यापाºयाकडे मका विकण्याशिवाय पर्याय दिसत नाही.
- सुभाष पहिलवान पाटोळे,
मका उत्पादक शेतकरी, येवला