बंदच्या अफवेने आदिवासी भागात शेतमाल पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 03:41 PM2018-06-07T15:41:11+5:302018-06-07T15:41:11+5:30

बाजारसमितीत फळभाज्या विक्रीसाठी न्यायच्या असतील तर सकाळच्या वेळी शेतमाल वाहतूक करणा-या चालकाकडून शेतक-यांना फळभाज्या भरण्यासाठी जाळया (प्लॅस्टिक क्रेट) पोहचविण्याचे काम केले जाते. मात्र गुरुवारी दिंडोरी तालुक्यातील अनेक आदिवासी पाडयावर शेतमाल वाहतूक करणा-या

The closing rumors fall into the tribal areas | बंदच्या अफवेने आदिवासी भागात शेतमाल पडून

बंदच्या अफवेने आदिवासी भागात शेतमाल पडून

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकरी चिंतातूर : आवक वाढण्याची शक्यताबाजारभावात कॅरेटमागे ५० ते १०० रूपयांनी वाढ

नाशिक : गेल्या आठवडयाभरापासून शेतकरी संघटनेने पुकारलेल्या संपाचा भाग म्हणून गुरुवारी बाजार समिती बंद राहणार असल्याच्या अफवेने भयभीत झालेल्या जिल्ह्यातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी फळभाज्यांचा खुडा न करता शेतमाल विक्रीलाही बाजार समितीत आणला नाही. दिंडोरी तालुक्यातील आदिवासी भागातील काही खेडयापाडयावर गुरुवारी सकाळी भाजीपाला वाहतूक करणारी वाहने फिरकलीच नाही.
बाजारसमितीत फळभाज्या विक्रीसाठी न्यायच्या असतील तर सकाळच्या वेळी शेतमाल वाहतूक करणा-या चालकाकडून शेतक-यांना फळभाज्या भरण्यासाठी जाळया (प्लॅस्टिक क्रेट) पोहचविण्याचे काम केले जाते. मात्र गुरुवारी दिंडोरी तालुक्यातील अनेक आदिवासी पाडयावर शेतमाल वाहतूक करणा-या चारचाकी फिरकल्याच नसल्याने शेतक-यांना शेतमाल विक्रीसाठी बाजारसमितीत नेता आला नाही. बाजारसमितीत शेतमालाची वाहतूक करणारी वाहने मुख्य वाहतूक मार्गावर अडविण्याचा प्रकार घडत असल्याचे तसेच गुरुवारी शेतकरी संघटनेच्या वतीने बाजारसमितीत आंदोलन केले जाणार असल्याची अफवा गेल्या दोन तीन दिवसांपासून पसरल्याने भयभीत झालेल्या शेतक-यांनी तसेच शेतमालाची वाहतूक करणा-या चारचाकी चालकांनी वाहनांचे नुकसान नको म्हणून मालवाहतूक गाडया बाहेर काढल्या नाहीत.
शेतकरी संघटनेचा बंद हा केवळ गुरूवारच्या दिवशी पर्यंतच असल्याची चर्चा शेतक-यांत असल्याने शेतकरी बांधवांनी बाजारसमितीत शेतमाल नेला नाही. गुरुवारी नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत फळभाज्या मालाची केवळ ३० ते ४० टक्के आवक आल्याने बुधवारपेक्षा बाजारभावात कॅरेटमागे ५० ते १०० रूपयांनी वाढ झाल्याचे व्यापा-यांनी सांगितले.

Web Title: The closing rumors fall into the tribal areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.