दोन नोव्हेंबरला राज्यातील शाळा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 01:04 AM2018-10-30T01:04:25+5:302018-10-30T01:04:46+5:30

शिक्षण विभाग शाळांकडून विनाकारण, अवास्तव, अव्यवहार्य व किचकट माहिती मागवत असल्याने गेल्या पाच वर्षांत शैक्षणिक कामाच्या व्यापात दहा पटीने वाढ असताना १५ वर्षांपासून कारकून भरती बंद, २०१२ पासून शिक्षकांच्या रिक्त जागांवर रखडलेली भरतीप्रक्रिया, शिक्षक नियुक्तीच्या प्रक्रियेला मान्यता घेण्यासाठी दाखल करावे लागले खटले आणि अधिकारी पातळीवर येणाऱ्या अडचणींविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने २ नोव्हेंबरला राज्यभरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीयमंत्री विजय नवल पाटील व कर्मवीर व्ही. एन. नाईक संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांनी सोमवारी (दि.२९) पत्रकार परिषदेतून दिली.

 Closing schools in the state on 2 November | दोन नोव्हेंबरला राज्यातील शाळा बंद

दोन नोव्हेंबरला राज्यातील शाळा बंद

Next

नाशिक : शिक्षण विभाग शाळांकडून विनाकारण, अवास्तव, अव्यवहार्य व किचकट माहिती मागवत असल्याने गेल्या पाच वर्षांत शैक्षणिक कामाच्या व्यापात दहा पटीने वाढ असताना १५ वर्षांपासून कारकून भरती बंद, २०१२ पासून शिक्षकांच्या रिक्त जागांवर रखडलेली भरतीप्रक्रिया, शिक्षक नियुक्तीच्या प्रक्रियेला मान्यता घेण्यासाठी दाखल करावे लागले खटले आणि अधिकारी पातळीवर येणाऱ्या अडचणींविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने २ नोव्हेंबरला राज्यभरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीयमंत्री विजय नवल पाटील व कर्मवीर व्ही. एन. नाईक संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांनी सोमवारी (दि.२९) पत्रकार परिषदेतून दिली.  महाराष्ट्रात खासगी शिक्षण संस्थांद्वारे गेली अनेक वर्षे शिक्षण देण्याचे कार्य सुरू आहे. परंतु, गेल्या काही वर्षांपासून संस्थाचालकांना अनेक आर्थिक, प्रशासकीय व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रभावित करणाºया समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाने २ नोव्हेंबरला राज्यातील शाळा बंद ठेवून लाक्षणिक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यात राज्यातील ७० ते ७५ शिक्षण संस्थांच्या शाळा बंद राहणार आहेत. परंतु, अनेक मोठ्या संघटना या आंदोलनापासून दूर राहण्याची शक्यता आहे. मोठ्या शिक्षणसंस्थांनी सरकारी हस्तक्षेपातून जवळपास ६३४ शिक्षकांची नियुक्ती करून घेतली आहे, त्यामुळे अशा संस्था सरकारच्या दबावाला बळी पडत असून, त्या या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता नसल्याचे यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाच्या पदाधिकाºयांनी सांगितले. यावेळी बाळासाहेब पाटील, रामराव मोरे, केशव पाटील, प्रभाकर धात्रक, विजय काळे, सोमनाथ चौधरी, प्रवीण जोशी, गणपत मुठाळ, सूर्यकांत रहाळकर आदी उपस्थित होते.
बेमुदत आंदोलनाचा इशारा
शिक्षण संस्थाचालकांच्या तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाने वारंवार पाठपुरा करूनही सरकारक डून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे संस्थाचालकांनी लाक्षणिक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतरही सरकारने संस्थाचालकांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर दिवाळीनंतर बेमुदत शाळा बंद आंदोलन करण्याचा इशाराही संस्थाचालकांनी यावेळी दिला.

Web Title:  Closing schools in the state on 2 November

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.