नाशिकरोड रेल्वेस्थानकावरील रिक्षाचालकांचा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 12:41 AM2018-05-08T00:41:58+5:302018-05-08T00:41:58+5:30
नाशिकरोड रेल्वेस्थानक आवारात रेल्वे प्रशासनाकडून रिक्षा रॅकमध्येच खासगी प्रीपेड प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी बॅरिकेड्स लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाला रिक्षा युनियनने तीव्र विरोध करत बॅरिकेड्स लावण्याचा प्रयत्न हाणून पाडला.
नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानक आवारात रेल्वे प्रशासनाकडून रिक्षा रॅकमध्येच खासगी प्रीपेड प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी बॅरिकेड्स लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाला रिक्षा युनियनने तीव्र विरोध करत बॅरिकेड्स लावण्याचा प्रयत्न हाणून पाडला. खासगी प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांना रॅक उपलब्ध करून देऊ नये म्हणून रिक्षाचालकांनी दोन दिवसांपासून बंद पाळल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या आवारात गेल्या ४०-५० वर्षांपासून रिक्षा-टॅक्सीचालक प्रवासी ने-आण करण्याचे काम करतात. त्याकरिता रेल्वे प्रशासनाकडून रिक्षा, टॅक्सी एका रांगेत उभ्या राहण्यासाठी रॅक करून देण्यात आला आहे. रिक्षा, टॅक्सी सोबत आता खासगी प्रीपेड प्रवासी वाहतूक करणाºया ओला, उबेरसारख्या कंपन्यांची वाहने प्रवासी वाहतूक व्यवसायात उतरली आहेत. रेल्वेस्थानकावरील रिक्षाचालकांनी पहिल्यापासून खासगी प्रवासी वाहनांना रेल्वेस्थानक आवारात येण्या-जाण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. गेल्या ४०-५० वर्षांपासून आम्ही प्रवासी वाहतूक करण्याचा व्यवसाय करतो. यावरच आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे खासगी प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांना रेल्वेस्थानक आवारात बंदी असावी, अशी रिक्षाचालकांची मागणी आहे. रिक्षांच्या रॅकमध्ये काही महिन्यांपूर्वी टप्प्याटप्प्याने लोखंडी बॅरिकेड्स लावल्याने रिक्षाचालकांनी त्याला तीव्र विरोध केला होता. लोखंडी बॅरिकेड्समुळे रॅकमध्ये रिक्षा कमी लागतात. त्या बॅरिकेड्सचा प्रवासी व रिक्षाचालकांनादेखील त्रास होतो असे स्पष्ट करण्यात आले होते. रेल्वे भुसावळ विभागाचे वरिष्ठ कमर्शिअल विभागाचे अधिकारी सुनील मिश्रा, खासदार हेमंत गोडसे व रिक्षाचालकांची संयुक्त बैठक झाली होती. बैठकीत गोडसे यांनी रिक्षाचालक स्थानिक भूमिपुत्र असून, ते गेल्या अनेक वर्षांपासून प्रवासी वाहतूक व्यवसाय करतात. त्यामुळे रिक्षाचालकांचा प्राधान्याने विचार करावा, असे गोडसे यांनी स्पष्ट केले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी शनिवारी मध्यरात्री रेल्वे प्रशासनाने रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने रिक्षा रॅकमध्ये अंतराअंतरांनी लावलेले लोखंडी बॅरिकेड्स एकमेकाला जोडण्यास सुरुवात केली. मात्र, खासगी ओला, उबेरसारख्या कंपन्यांच्या वाहनांना रेल्वेस्थानकात बंदी करण्याचा निर्णय घेण्यात यावा या मागणीसाठी दोन दिवसांपासून बंद पुकारला आहे. रेल्वेस्थानक रिक्षा रॅकमध्ये सर्व रिक्षा उभ्या करून बंद पुकारण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या सुट्या व लग्नसराईमुळे प्रवाशांची मोठी वर्दळ आहे. त्यात रिक्षाचालकांच्या बंदमुळे प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत.