मनपा कर्मचाऱ्यांचा संप मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:44 AM2019-07-17T00:44:59+5:302019-07-17T00:46:05+5:30

सातवा वेतन आयोग आणि अन्य विविध कारणांसाठी नाशिक महापालिकेतील म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने येत्या १७ तारखेनंतर कोणत्याही क्षणी संप पुकारण्याचा निर्णय मंगळवारी (दि.१६) मागे घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

The closure of the NMC workers | मनपा कर्मचाऱ्यांचा संप मागे

मनपा कर्मचाऱ्यांचा संप मागे

Next

नाशिक : सातवा वेतन आयोग आणि अन्य विविध कारणांसाठी नाशिक महापालिकेतील म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने येत्या १७ तारखेनंतर कोणत्याही क्षणी संप पुकारण्याचा निर्णय मंगळवारी (दि.१६) मागे घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
संघटनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे व सरचिटणीस राजेंद्र मोरे यांनी ही माहिती दिली. नाशिक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसदर्भात गेल्या दोन वर्षांपासून संघटना पाठपुरावा करीत होती. त्यासंदर्भात माजी आयुक्तअभिषेक कृष्ण तसेच तुकाराम मुंढे यांच्या उपस्थितीत बैठकादेखील झाल्या त्यातील काही मागण्या मान्य झाल्या असल्या तरी अन्य मागण्या अधिकाºयांच्या बदल्यांमुळे मागे पडल्या होत्या. संघटनेने ठोस मागण्या मान्य करा अन्यथा १७ जुलैनंतर कोणत्याही क्षणी संप पुकारण्याची नोटीस दिली होती, परंतु महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मंगळवारी (दि.१६) आयुक्तांनी सातवा वेतन लागू करण्याचे आश्वासन दिले. तसेच अन्य शासन स्तरावरील मागण्यांबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आणि महापालिकेच्या पातळीवर मागण्या मान्य करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त (शहर) आणि उपआयुक्त (प्रशासन) यांची समिती नियुक्त केली. त्यासंदर्भातील परिपत्रक मंगळवारी (दि.१६) संघटनेला मिळाले. त्यामुळे दुपारी सेनेची आणि अन्य संघटना पदाधिकाºयांची बैठक झाली. यात झालेल्या चर्चेनुसार संप मागे घेण्यात आला आहे.

Web Title: The closure of the NMC workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.