मेशीसह परिसरात ढगाळ वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 01:07 AM2018-03-12T01:07:28+5:302018-03-12T01:07:28+5:30

मेशी : सध्या मेशीसह परिसरात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे विविध पिकांवर विविध प्रकारच्या रोगांचे आक्रमण झाले आहे. अधूनमधून वादळी वारे वाहत आहे, तसेच पावसाचा शिडकावा होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

Cloudy atmosphere in the area with meshes | मेशीसह परिसरात ढगाळ वातावरण

मेशीसह परिसरात ढगाळ वातावरण

Next
ठळक मुद्दे पिकांवर रोग : शेतकरी हवालदिलशासनाने हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत

मेशी : सध्या मेशीसह परिसरात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे विविध पिकांवर विविध प्रकारच्या रोगांचे आक्रमण झाले आहे. अधूनमधून वादळी वारे वाहत आहे, तसेच पावसाचा शिडकावा होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
या सर्व बाबींचा परिणाम विहिरींची पाणी पातळी कमी होण्यावर झाला आहे. यामुळे काढून ठेवलेला हरभरा तसेच कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. याचबरोबर या भागातील नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाºया कांद्याचा बाजारभाव दिवसेंदिवस कमी होत आहे. अगदी उत्पादन खर्चदेखील निघत नाही. सुमारे ४०० ते ५०० रुपये एवढ्या तुटपुंज्या बाजारभावात शेतकºयांना कांदा विकावा लागत आहे.
मागील महिन्यात बाजारभाव बरे होते म्हणून शेतकरी सुखावला होता; परंतु सध्या मात्र खर्चदेखील निघत नाही.
या भागातील प्रमुख पीक कांदा आहे. नव्हे, या भागातील जमीन या पिकासाठी पोषक आहे. त्यामुळे कांद्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही. अशा वेळी सरकारने या पिकाला हमीभाव द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. सध्या लग्नसराई सुरू आहे. त्यामुळे शेतकºयांचे प्रश्न अधिक बिकट होत आहेत.
उपवर मुलींचे लग्न कसे करावे, या विवंचनेत सर्व शेतकरी दिवस कंठत आहेत. ढगाळ वातावरण, कांद्याच्या बाजारभावात घसरण यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यासाठी शासनाने हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

Web Title: Cloudy atmosphere in the area with meshes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक