तळवाडेत ढगफुटीसदृश पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2022 01:59 AM2022-06-23T01:59:36+5:302022-06-23T02:00:04+5:30

मालेगाव: तालुक्यातील तळवाडे दुंधे भागात सायंकाळी ढगफुटीसदृश पाऊस झाला असून संततधार पाऊस सुरू आहे. तळवाडे धरणाला पाणीपुरवठा करणारा पाट कालवा फुटल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

Cloudy rain in Talwada | तळवाडेत ढगफुटीसदृश पाऊस

तळवाडेत ढगफुटीसदृश पाऊस

googlenewsNext

मालेगाव: तालुक्यातील तळवाडे दुंधे भागात सायंकाळी ढगफुटीसदृश पाऊस झाला असून संततधार पाऊस सुरू आहे. तळवाडे धरणाला पाणीपुरवठा करणारा पाट कालवा फुटल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. संततधार जोरदार पाऊस असल्याने कालव्याच्या मोऱ्या तुटल्या. डावा कालव्याचे पाणी नाल्यातून वाहत असून रस्ता वाहतूक विस्कळीत झाली आहे. साकूर - तळवाडे मार्गावर सिंदबन भागात पुराचे पाणी वाहत असून रस्त्यावरील मोरी तुटली आहे. तळवाडे रावळगाव मार्गावरही शेवाळीनाला पाण्याने पूर्ण भरला असून नाल्यावरून पाणी वाहत असल्याने रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. रावळगाव तळवाडे मार्गावर फरशी पुलावरून पाणी वाहत आहे. शेतातही पाणी साचले असून मशागत कामे आटोपलेल्या शेतकऱ्यात समाधान व्यक्त होत आहे.

Web Title: Cloudy rain in Talwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.