देवगाव परिसरातील पिकांना ढगाळ हवामानाचा फटका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:30 AM2020-12-16T04:30:39+5:302020-12-16T04:30:39+5:30
तीन दिवसांपासून हवामान बदलाने पडणाऱ्या बेमोसमी पावसामुळे देवगावसह वावीहर्ष, टाकेदेवगाव, श्रीघाट, येल्याचीमेंट, चंद्राचीमेंट, आव्हाटे, डहाळेवाडी, टाकेहर्ष आदी गावांत शेतकऱ्यांनी ...
तीन दिवसांपासून हवामान बदलाने पडणाऱ्या बेमोसमी पावसामुळे देवगावसह वावीहर्ष, टाकेदेवगाव, श्रीघाट, येल्याचीमेंट, चंद्राचीमेंट, आव्हाटे, डहाळेवाडी, टाकेहर्ष आदी गावांत शेतकऱ्यांनी कापणी केलेल्या व खळ्यावर गंजी रचून ठेवलेल्या भाताची उडवी भिजल्याने पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडला आहे. यावर्षी खरीप हंगामाच्या प्रारंभी पावसाची प्रतीक्षा व नंतरच्या काळात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे भातशेती नष्ट झाली. पावसापासून वाचवलेल्या पिकांची कापणी करून खळ्यावर मळणीसाठी तयार असलेल्या भातात आता पावसाचे पाणी शिरल्याने उरलेसुरले धान्यदेखील भिजून वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. खळ्यावर रचून ठेवलेल्या भाताच्या उडव्याची पावसापासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्लास्टिक ताडपत्रीच्या साहाय्याने झाकणी केली आहे. परंतु, प्लास्टिक ताडपत्री किंवा इतर काही साधन नसलेल्या शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे.
===Photopath===
151220\15nsk_14_15122020_13.jpg
===Caption===
देवगाव परिसरातील शेतकऱ्यांनी धान्यांचा बचाव करण्यासाठी प्लास्टिक ताडपत्रीचा घेतलेला आधार.१५ देवगाव १