ढगाळ हवामान कायम; सरी थांबल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:32 AM2020-12-15T04:32:02+5:302020-12-15T04:32:02+5:30
लहरी निसर्गामुळे वातावरण बदलाचा कमालीचा अनुभव नाशिककरांना मागील चार दिवसांपासून येत आहे. शनिवारपासून रिमझिम सरींचा वर्षाव शहरात झाला. दिवसभर ...
लहरी निसर्गामुळे वातावरण बदलाचा कमालीचा अनुभव नाशिककरांना मागील चार दिवसांपासून येत आहे. शनिवारपासून रिमझिम सरींचा वर्षाव शहरात झाला. दिवसभर ढगाळ हवामान कायम राहिल्याने नाशिककरांना रविवारीसुद्धा सूर्यदर्शन घडले नाही. सोमवारी वातावरणातील धुरक्याचे प्रमाण काहीसे कमी झाले होते. तसेच ढगांचीही संख्या काहीशी कमी झाल्याने मळभ थोडेफार हटण्यास मदत झाली. सकाळी आर्द्रतेचे प्रमाण अधिक राहिले, मात्र सायंकाळच्या सुमारास आर्द्रता कमी नोंदविली गेली. पावसाचा शिडकावा थांबल्यामुळे गारठा काहीसा कमी झाला.
अरबी समुद्रात उठणाऱ्या लहान-मोठ्या वादळांमुळे तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणि नैऋत्य व वायव्य मोसमी वाऱ्यांची परस्परविरुद्ध बदललेली दिशा यामुळे चक्रवात क्षेत्राची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे वातावरण बदलाचा अनुभव नाशिककरांना येत आहे. उत्तर महाराष्ट्राचे हवामान यामुळे अधिक प्रभावीत झाल्याचे हवामान केंद्राचे म्हणणे आहे.
छायाचित्र ८७