दिवसभर ढगाळ वातावरण, पावसाची मात्र उघडीप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2022 01:44 AM2022-06-25T01:44:30+5:302022-06-25T01:44:51+5:30
दिवसभर ढगाळ वातावरण आणि उकाड्यानंतर शुक्रवारचा (दि. २४) दिवस पावसाविना कोरडाच गेला. सकाळपासून ढगाळ हवामान असल्याने पावसाची शक्यता वर्तवली जात होती. हवामान खात्यानेदेखील पावसाचा इशारा दिला होता. मात्र, शहराच्या आजूबाजूला तुरळक सरींचा अपवाद वळगता दमदार पाऊस बसरला नाही.
नाशिक : दिवसभर ढगाळ वातावरण आणि उकाड्यानंतर शुक्रवारचा (दि. २४) दिवस पावसाविना कोरडाच गेला. सकाळपासून ढगाळ हवामान असल्याने पावसाची शक्यता वर्तवली जात होती. हवामान खात्यानेदेखील पावसाचा इशारा दिला होता. मात्र, शहराच्या आजूबाजूला तुरळक सरींचा अपवाद वळगता दमदार पाऊस बसरला नाही. दरम्यान, शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत शहरात २४.४ मिमी पावसाची नोंद झाली.
नाशिक शहरात बुधवार आणि गुरुवारी सलग दोन दिवस जोरदार पावसाने हजेरी लावली. ग्रामीण भागातदेखील समाधानकारक पाऊस पडल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. गुरुवारी रात्री मध्यरात्रीपर्यंत पाऊस सुरू होता. तसेच शुक्रवारीदेखील दमदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार दिवसभर ढगाळ वातावरण असले तरी पाऊस पडला नाही. मात्र ढगाळ वातावरणामुळे दिवसभर उकाडा जाणवत होता. दरम्यान, दोन दिवसांच्या पावसामुळे तापमानात घट झाली असून, शुक्रवारी कमाल तापमान २८.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
----------
देवळाली कॅम्पला रिमझिम
देवळाली कॅम्प परिसरात शुक्रवारी (दि. २४) पावसाची रिमझिम सुरू होती. दरम्यान, गुरुवारी रात्री झालेल्या पावसाने पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी दिलासा मिळाला असून, मशागतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. शुक्रवारी दिवसभर अधूनमधून रिमझिम सरी कोसळत असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली.