लाॅकडाऊन काळातही लवंगी मिरचीचे भरघोस उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:11 AM2021-06-29T04:11:01+5:302021-06-29T04:11:01+5:30
आपल्या वडिलोपार्जित पाच एकर शेतीमध्ये इतर ठिकाणी कोबी, टोमॅटो, कोथिंबीर आदी पिके घेत अवघ्या २० ते २५ गुंठ्यात ...
आपल्या वडिलोपार्जित पाच एकर शेतीमध्ये इतर ठिकाणी कोबी, टोमॅटो, कोथिंबीर आदी पिके घेत अवघ्या २० ते २५ गुंठ्यात नेञा ॲस्टाॅन कंपनीच्या लवंगी मिरचीचे वाण लावून त्यांनी भरघोस उत्पन्न घेतले आहे. लाॅकडाऊनमुळे बाजार समित्या तसेच इतर भाजीपाला मार्केटही बंद करण्यात आल्यामुळे पुढील उत्पन्न बंद करावे लागल्याने नफा मंदावला. वंजारवाडी शिवारात आपल्या वडिलोपार्जित शेतीत पारंपरिक पिके घेतली जात होती. अखेर शेतीत नशीब आजमावत त्यांनी जोडधंदा म्हणून ट्रॅक्टर घेतला. पारंपरिक पिकांना फाटा देत त्यांनी लवंगी मिरचीचे वाण आणले. उत्तमप्रकारे नियोजन करत ४ ते ५ फूट सरी तयार करत त्यावर मल्चिंग पेपर टाकत ठिबक सिंचनाद्वारे झाडांना पाण्याची सोय केली. त्यानंतर महागडी औषधे फवारणी करत झाडे हळूहळू फुलांवर आली. त्यानंतर झाडांना फळे आल्यानंतर भरघोस उत्पन्न घ्यायला सुरुवात झाली. पराड यांनी पहिल्याच तोडीला जवळपास ३८० ते ३९० क्रेट लवंगी मिरचीचे उत्पन्न घेत लाखो रुपये नफा कमाविला. यानंतर दररोज १०० ते १५० क्रेट मिरचीचे उत्पन्न निघू लागले. यासाठी त्यांना पत्नी तसेच आई मथुराबाई तुकाराम पराड यांची मोलाची मदत झाली असल्याचे शेतकरी पराड यांनी सांगितले.
------------------
वंजारवाडी येथील शेतकरी संदीप पराड यांनी लवंगी मिरचीचे घेतलेले पीक दाखवताना आई मथुराबाई पराड. (२८ नांदूरवैद्य फार्म)
===Photopath===
280621\28nsk_4_28062021_13.jpg
===Caption===
२८ नांदूरवैद्य फार्म