संगमेश्वरात कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 05:07 PM2018-08-09T17:07:21+5:302018-08-09T17:07:53+5:30
संगमेश्वर : सकल मराठा समाजाला आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाचा बंदच्या आवाहनास संगमेश्वरात १०० टक्के पाठिंबा मिळाला. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला.
संगमेश्वर : सकल मराठा समाजाला आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाचा बंदच्या आवाहनास संगमेश्वरात १०० टक्के पाठिंबा मिळाला. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला.
आज सकाळपासूनच महात्मा फुले रोडवर शुकशुकाट होता. रिक्शा, शैक्षणिक संस्था तसेच छोटी-मोठी व्यापारी दुकाने आज संपूर्णपणे व उत्स्फूर्तपणे बंद ठेवून पाठिंबा दिला. दवाखाने व औषधी दुकाने ह्या अत्यावश्यक सेवा मात्र चालू होत्या. संगमेश्वरातील म. फुले रस्ता, सांडवा पुल, मोसमपूल, रामसेतू पुल ह्या अत्यंत वर्दळीच्या भागात शुकशुकाट होता. रिक्शाची ये-जा बंद होती. हॉटेल, टपऱ्या, पानदुकाने संपूर्णपणे बंद होती. पोलिसांच्या गस्त चालू होता. कुठलीही अनुचित घटना न घडता बंद शांततेत पार पडली. ठिकठिकाणी पोलिसांनी संरक्षक जाळ्या लावून रस्ता अडविला होता. नागरिक व तरुण गटागटाने चर्चा करताना दिसत होते. सर्वांनीच उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभाग घेतल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांचे मात्र रिक्शा, बस तसेच खासगी प्रवासी वाहनांअभावी हाल झाले. त्यांना पायी चालत जावे लागले. वाहनाअभावी सर्वच रस्ते मोकळे झाले.