सटाणा तालुक्यात कडकडीत बंद

By admin | Published: June 4, 2017 02:07 AM2017-06-04T02:07:25+5:302017-06-04T02:07:44+5:30

सटाणा : शेतकऱ्याच्या राज्यव्यापी संपाच्या आज शनिवारी तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर संप मागे घेतल्याचे जाहीर केले

Clutches in the Teesta taluka | सटाणा तालुक्यात कडकडीत बंद

सटाणा तालुक्यात कडकडीत बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सटाणा : शेतकऱ्याच्या राज्यव्यापी संपाच्या आज शनिवारी तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर संप मागे घेतल्याचे जाहीर केले असले तरी बागलाण तालुक्यातील शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. शनिवारी शहरातील आठवडे बाजार इतिहासात प्रथमच बंद ठेऊन शेतकरी संपला उत्स्फूर्त पाठिंबा दिला.तसेच शहरातील व्यापाऱ्यांनीही दिवसभर दुकाने बंद ठेऊन पाठिंबा दिला.त्यामुळे दिवसभर शहरात शुकशुकाट होता.
शेतकर्यांचा सातबारा उतारा कोरा करावा ,शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा आदी मागण्यासाठी ७ जून पर्यंत शेतकरी संपावर उतरला आहे. या राज्यव्यापी संपाला धार देण्यासाठी तीन दिवसांपासून सटाणा ,लखमापूर ,नामपूर ,ताहाराबाद ,जायखेडा ,वीरगाव ,डांगसौंदाणे आदी ठिकाणी रास्तारोको ब आठवडे बाजार बंद ठेवण्यात आले होते.
शेतकरी क्र ांती मोर्चाचे रामचंद्रबापू पाटील ,पंडितराव भदाणे ,सुभाष नंदन ,पाप्पुतात्या बच्छाव ,राघोनाना अिहरे ,यशवंत पाटील ,यशवंत अिहरे ,शैलेश सूर्यवंशी ,किशोर कदम ,प्रकाश निकम ,पांडुरंग सोनवणे ,ज.ल.पाटील ,दगाबापू सोनवणे आदींनी शनिवारी शहरातील आठवडे बाजार व बाजार पेठ बंदचे आवाहन केले होते. सकाळी देखील क्र ांती मोर्चाचे नगरसेवक राहुल पाटील ,दिनकर सोनवणे ,काका सोनवणे ,आनंद सोनवणे ,धर्मा सोनवणे ,साहेबराव सोनवणे यांनी शहरात रॅली काढून बंदचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला शहर कडकडीत बंद ठेऊन उत्स्फूर्त पाठिंबा दिला.
दरम्यान सटाणा शहरात आठवड्याच्या दर शनिवारी साप्ताहिक बाजार भरतो .या बाजारासाठी संपूर्ण कसमादे पट्टयासह साक्र ी तालुक्यातील शेतकरी ,शेतमाल व्यापारी माल विक्र ीसाठी येतात .यामुळे एका दिवसात लाखो रु पयांची उलाढाल होत असते. शेतकऱ्याच्या या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी क्र ांती मोर्चाने बाजार बंदची हाक दिली होती. तसेच किराणा व्यापारी संघटना , सुवर्णकार संघटना , हार्डवेअर असोसिएशन, हॉकर्स युनियन आदींनी दिवसभर दुकाने बंद ठेवल्यामुळे शहरात अघोषित संचारबंदी लागू झाल्याचे चित्र होते.बंद काळात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात होता.

Web Title: Clutches in the Teesta taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.