औषध विक्रेत्यांचा कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 01:12 AM2018-09-29T01:12:35+5:302018-09-29T01:13:19+5:30
ई-फार्मसीवर बंदी घालावी या मागणीसाठी औषध विक्रेत्यांनी देशभर पुकारलेल्या बंदला नाशिक जिल्ह्यातून शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शहर व जिल्ह्यातील सुमारे साडेचारशे विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवून गोळे कॉलनीतून शासनाविरोधात मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
नाशिक : ई-फार्मसीवर बंदी घालावी या मागणीसाठी औषध विक्रेत्यांनी देशभर पुकारलेल्या बंदला नाशिक जिल्ह्यातून शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शहर व जिल्ह्यातील सुमारे साडेचारशे विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवून गोळे कॉलनीतून शासनाविरोधात मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. दरम्यान, अत्यवस्थ रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी रुग्णांना आवश्यक औषधे उपलब्ध करून देत त्यांची गैरसोय थांबविली. देशात व राज्यात सशर्तपणे बेकायदेशीररीत्या इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातून आॅनलाइन औषध विक्री व ई-पोर्टलबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विक्रेता संघटनेने चोवीस तास बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार शुक्रवारी नाशिक जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेत्यांनी आपले दुकाने बंद ठेवली. प्रामुख्याने ई-फार्मसीवर बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, औषधांअभावी अत्यवस्थ रुग्णांचे हाल होऊ नये म्हणून असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी गोळे कॉलनीत अत्यावश्यक सेवा सुरू ठेवली होती, त्यामुळे रुग्णांचे हाल टळले. हा बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल अहिरे, नाशिकचे अध्यक्ष प्रशांत पवार, संदीप शेवाळे, विनोद बाविस्कर आदींनी केला आहे.
रुग्णांच्या जीविताला धोका
ई-फार्मसीच्या माध्यमातून घरपोच विक्री केल्या जाणाºया औषधांमुळे रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, तसेच कायद्याने ज्या औषधांना प्रतिबंधित केलेले आहे अशी औषधेही विक्री केली जाणार असल्याने औषध विक्रेत्यांनी त्याला विरोध केला आहे. शासनाच्या या निर्णयाविरोधात सकाळी विक्रेत्यांनी गोळे कॉलनी येथील संघटनेच्या कार्यालयापासून मोर्चा काढून, शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन सादर केले.