वीजबिले वेळेवर मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 05:39 PM2018-11-18T17:39:15+5:302018-11-18T17:39:29+5:30
नांदूरशिंगोटे : महावितरण कंपनीकडून सध्या ठेकेदारी पद्धतीने मीटर वाचन व बिले वाटप करण्याचे नियोजन गेल्या एक वर्षापासून सुरू केले आहे. मात्र आजची स्थितीला नांदूरशिंगोटे येथील ग्राहकाला गेल्या दोन महिन्यापासून घरगुती व व्यावसायिकांना बिले वेळेवर मिळत नाहीत त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.
नांदूरशिंगोटे : महावितरण कंपनीकडून सध्या ठेकेदारी पद्धतीने मीटर वाचन व बिले वाटप करण्याचे नियोजन गेल्या एक वर्षापासून सुरू केले आहे. मात्र आजची स्थितीला नांदूरशिंगोटे येथील ग्राहकाला गेल्या दोन महिन्यापासून घरगुती व व्यावसायिकांना बिले वेळेवर मिळत नाहीत त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.
तालुक्यातील नांदुरशिंगोटे भागात आजमितीला महावितरणचे १००० च्या आसपास ग्राहक असून त्यांना बिले वेळेवर मिळत नाही. त्यामुळे ग्राहकांची बिले भरण्याची अंतिम तारीख संपल्यानंतर बिले वाटपाचे काम ठेकेदाराकडून करण्यात येत आहे. या पद्धतीमुळे ग्राहकाला त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक कर्मचारी वर्गाला वसुलीस गेल्यास मला लाईट बिल मिळत नसल्याचे ग्राहक वर्ग कडून तक्र ार येत आहे.
या तक्रारी दिवसेंदिवस वाढत चालली असून आम्हाला वेळेवर विज बिल न मिळाल्याने आम्ही बिले भरावयाची कशी असा ग्राहक वर्ग प्रश्न उपस्थित करत आहेत. वीज बिले निर्धारित तारखेच्या नंतर भरल्यामुळे नागरिकांना दंडपोटी १० ते २० रुपये अधिक भरावे लागत आहे. त्यामुळे महावितरणच्या महसुलामध्ये वसुलीच्या कामांमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहे.
वरिष्ठ पातळीवरून या प्रकाराची चौकशी करून जो कोणी ठेकेदार या भागात काम पाहात असेल त्यांना याबाबत त्वरित बिले वाटप करून अंतिम तारखेच्या आत ग्राहकाला बिले कशी अदा केली जातील याबाबत सुचना देण्यात याव्या. याप्रकरणी वरिष्ठ पातळीवर चौकशी करून ठेकेदारांना सुचना करण्याची मागणी परिसरातील ग्राहकांकडून केली जात आहे.
ग्राहकाला लवकरात लवकर बिले वाटप झाली तरच ती बिले ग्राहक वर्ग भरू शकेल व महावितरणाचा महसूल वेळेतच वसूल होईल. एकंदरीत याबाबत सर्व गोष्टींचा विचार करून व ग्रामीण भागातील वर्गाला त्रास कसा कमी होईल या बाबतची महावितरणने दखल घ्यावी. वरिष्ठ पातळीवरून त्वरित दखल घेऊन ग्राहक वर्गाची समस्या सोडविण्याची मागणी केली जात आहे.
- पी. एस. शेळके, ग्राहक, नांदूरशिंगोटे
वीजबिल रिडींग, बिल प्रिंटींग व बिल वाटप हे गेल्या वर्षभरापासून खासगी एजन्सीमार्फेत केले जात आहे. गावात काही ग्राहकांना वीजबिले मिळत नसल्याच्या तक्रारी आल्या आहे. दोन दिवसापूर्वी गावातील एक हॉटेल जवळ वीजबिलांचा गठ्ठा बेवारस स्थितीत आढळून आला होता. सदर वीजबिलांच्या गठठ्यांचा पंचनामा केला असून कारवाई संदर्भात वरिष्ट पातळीवर पत्रव्यवहार केला आहे.
- आर. एस. भगत, सहाय्यक अभियंता, नांदूरशिंगोटे.