Eknath Shinde: मुंबईचं श्रेय कोणालाही घेता येणार नाही; बोलताना काळजी घ्या, एकनाथ शिंदेंनीही राज्यपालांचे टोचले कान

By मुकेश चव्हाण | Published: July 30, 2022 01:41 PM2022-07-30T13:41:12+5:302022-07-30T14:20:35+5:30

बाळासाहेब ठाकरेंचंही मुंबईसाठी मोठं योगदान आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

CM Eknath Shinde said that we as Shiv Sena do not agree with Governor Bhagat Singh Koshyari's opinion. | Eknath Shinde: मुंबईचं श्रेय कोणालाही घेता येणार नाही; बोलताना काळजी घ्या, एकनाथ शिंदेंनीही राज्यपालांचे टोचले कान

Eknath Shinde: मुंबईचं श्रेय कोणालाही घेता येणार नाही; बोलताना काळजी घ्या, एकनाथ शिंदेंनीही राज्यपालांचे टोचले कान

googlenewsNext

नाशिक/मुंबई- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचं विधान वैयक्तिक आहे. त्यामुळे आम्ही शिवसेना म्हणून राज्यपालांच्या मताशी सहमत नाही. मराठी लोकांचं मुंबईसाठी मोठं योगदान आहे. त्यामुळे मराठी माणसांचं योगदान कोणालाही नाकारता येणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

राज्यपाल म्हणजे एक प्रमुख पद असतं. त्यामुळे कोणाचाही अपमान होणार नाही, याची बोलताना काळजी त्यांनी घेतली पाहिजे. मराठी माणसामुळेच मुंबईला वैभव आहे. मराठी माणसांचं योगदान कोणालाही नाकारता येणार नाही. इतर राज्यातील, समाजातील लोक व्यवसायच करतात. मात्र मुंबईचं श्रेय कोणालाही घेता येणार नाही, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

राज्यपालांच्या वक्तव्याची निंदा करावी तितकी कमीच; जाहीर माफी मागा- आदित्य ठाकरे

संयुक्त महराष्ट्राच्या लढ्यात रक्त सांडून मुंबई हक्कानं मिळवली आहे. १०५ हुतात्मे त्यासाठी झाले आहेत. बाळासाहेब ठाकरेंचंही मुंबईसाठी मोठं योगदान आहे. बाळासाहेब मराठी माणसांसाठी लढत होते. बाळासाहेब नेहमी मुंबईच्या पाठीशी राहिले, असंही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं. एकनाथ शिंदे सध्या मालेगाव दौऱ्यावर आहेत. त्यावेळी पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका मांडली.

“माझ्या वक्तव्याचा विपर्यास, एका समाजाचं कौतुक दुसऱ्या समाजाचा अपमान नसतो”

दरम्यान, आज महाराष्ट्रात राहून, सर्वकाही ओरपलं आहे. महाराष्ट्रात मराठी माणसाचा अपमान केला आहे. महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आहे. महाराष्ट्रात अनेक गोष्टी आहेत. कोल्हापूरचं वहाण त्यांना दाखवायची गरज आहे. ते महाराष्ट्राचं वैभव आहे. त्याचा अर्थ कोणी कसा लावायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात साधी माणसं काय कष्टानं वर येतात हे सांगण्यासाठी मी त्याचा वापर केला, असं माजी मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. हे अनावधानानं आलेलं विधान नाही. काही ठिकाणी राज्यपाल तत्परतेनं हलताना दिसतात, काही ठिकाणी ते अजगरासारखे सुस्त बसलेले दिसतात असं म्हणत त्यांनी टीकाही केली.

काय म्हणाले होते राज्यपाल?

“कधी कधी मी लोकांना सांगतो महाराष्ट्रात आणि विशेष करून मुंबई ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास तुमच्याकडे पैसे राहणार नाहीत. मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते आर्थिक राजधानीही म्हटलं जाणार नाही,” असं कोश्यारी या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत.

Web Title: CM Eknath Shinde said that we as Shiv Sena do not agree with Governor Bhagat Singh Koshyari's opinion.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.