मुख्यमंत्री भविष्य प्रकरण : अंकशास्त्र सिद्ध करा, २१ लाख रूपये जिंका! अंनिसचे ईशान्येश्वर संस्थानला थेट आव्हान

By संजय पाठक | Published: November 25, 2022 02:27 PM2022-11-25T14:27:59+5:302022-11-25T14:30:12+5:30

दोन दिवसांपूर्वी शिर्डी दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक या मंदिराला भेट देऊन भविष्यासाठी हात दाखवल्याची चर्चा आहे.

CM Eknath Shinde's visit to astrologer : Prove Numerology, Win 21 Lakh Rupees! Annis's direct challenge to the Northeast Sansthan in Nashik | मुख्यमंत्री भविष्य प्रकरण : अंकशास्त्र सिद्ध करा, २१ लाख रूपये जिंका! अंनिसचे ईशान्येश्वर संस्थानला थेट आव्हान

मुख्यमंत्री भविष्य प्रकरण : अंकशास्त्र सिद्ध करा, २१ लाख रूपये जिंका! अंनिसचे ईशान्येश्वर संस्थानला थेट आव्हान

googlenewsNext

नाशिक - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मंत्र्यांना सोबत घेऊन ईशान्येश्वर मंदिरात भविष्य पाहिल्याची चर्चा सध्या चालु आहे. मात्र, अंकशास्त्रात हात पाहिला जात नाही हा संबंधीत देवस्थानमधील व्यक्तीने केला दावा मान्य करीत आता अंकाद्वारे भविष्य पहाणे हे शास्त्र आहे, हे सिद्ध करा आणि २१ लाख रूपये जिंका असे आव्हानच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिले आहे. त्यामुळेच दोन दिवसांपूर्वी शिर्डी दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक या मंदिराला भेट देऊन भविष्यासाठी हात दाखवल्याची चर्चा आहे, त्यामुळे हे आव्हान महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी दिले आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी रुद्र पूजा करण्यास अंनिसचा विरोध नाही. भारतीय संविधानाने प्रत्येकास श्रद्धा व उपासनेचा आधिकार दिला आहे. परंतु संबधित
व्यक्तीची ख्याती पाहता ही पूजा भविष्यातील अडचणीवर मात करण्यासाठी केलेला तोडगा असावा असे अंनिसला संशय आहे. मुख्यमंत्र्यांना रुद्र पूजा करायची तर मुंबईला अथवा कुठेही करु शकत होते. मात्र ईशान्येश्वर मंदिरात केली. कारण अंकशास्त्राच्या आधारे भविष्य पाहुन हा तोडगा केला असावा,असा संशय असल्याचे चांदगुडे यांनी म्हटले आहे.

Web Title: CM Eknath Shinde's visit to astrologer : Prove Numerology, Win 21 Lakh Rupees! Annis's direct challenge to the Northeast Sansthan in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.