कोथंबिर जगविण्यासाठी ठॅँकरने पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 07:04 PM2019-06-06T19:04:08+5:302019-06-06T19:04:37+5:30
खेडलेझुंगे : यंदा पावसाने नाशिक जिल्ह्यात पाठ फिरवली असून निफाड तालुक्यात मागील मिहन्यांपासुन दिवसापासून दुष्काळाच्या झळा जाणवत असताना विहिरी, हातपंप, बोअरवेल यांनी तर केव्हाच तळ गाठला असून धारणगांव खडक येथील शेतकरी नाना कारभारी वाघचौरे यांनी 12 गुंठे (एक बिघा) लागवड केलेली कोथंबिर पीक पाण्याअभावी सुकून चालली असताना कोथिबर पिकाला देण्यासाठी मुबलक पाणी नसल्याने टँकर द्वारे पाणी उपलब्ध करून पाणी देऊन कोथंबिर जगवण्याचा प्रयत्न करत आहे.
खेडलेझुंगे : यंदा पावसाने नाशिक जिल्ह्यात पाठ फिरवली असून निफाड तालुक्यात मागील मिहन्यांपासुन दिवसापासून दुष्काळाच्या झळा जाणवत असताना विहिरी, हातपंप, बोअरवेल यांनी तर केव्हाच तळ गाठला असून धारणगांव खडक येथील शेतकरी नाना कारभारी वाघचौरे यांनी 12 गुंठे (एक बिघा) लागवड केलेली कोथंबिर पीक पाण्याअभावी सुकून चालली असताना कोथिबर पिकाला देण्यासाठी मुबलक पाणी नसल्याने टँकर द्वारे पाणी उपलब्ध करून पाणी देऊन कोथंबिर जगवण्याचा प्रयत्न करत आहे. आतापर्यंत सुमारे 5 टँकर पाणी कोथंबिरीसाठी टाकण्यात आले आहेत.
खरीप हंगामातील पिके पाण्याअभावी करपून गेली असल्याने झालेला खर्च देखील फिटला नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. एिप्रल-मे मिहन्यात उन्हाची तीव्रता अधिक असल्याने शक्य होईल तेव्हढेच पाणी पिकाला देत असल्याने पिकांची वाढ देखील खुंटली आहे. परिसरातील फळबागा पाण्याअभावी आण िउन्हाच्या तीव्रतेमुळे करपुन जावुन मोठ्याप्रमाणावर नुकसान झालेले आहे. पिकांची वाढ खुंटल्याने उत्पादन देखील मोठीं घट झाली आहे. परिसरातील शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्यामुळे दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्याने काही दिवसांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून जनावरांच्या पाण्याचा व चार्याचा प्रश्न देखील गंभीर झाला आहे.