बैलाच्या दोराऐवजी हाती आला कोब्रा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 02:42 PM2020-07-09T14:42:18+5:302020-07-09T14:42:34+5:30
नांदगाव : खुंट्याला बांधलेला बैल सुटल्याने त्याच्यामागे धावणाऱ्या बालकाच्या हातात बैलाच्या दोराऐवजी कोब्रा आल्याने त्याने एकदा नव्हे; तर दोन्ही हातांना कडकडून दंश केला. या हल्यात गंभीर जखमी झालेल्या बालकाचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना दोन दिवसांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर यश आले.
नांदगाव : खुंट्याला बांधलेला बैल सुटल्याने त्याच्यामागे धावणाऱ्या बालकाच्या हातात बैलाच्या दोराऐवजी कोब्रा आल्याने त्याने एकदा नव्हे; तर दोन्ही हातांना कडकडून दंश केला. या हल्यात गंभीर जखमी झालेल्या बालकाचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना दोन दिवसांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर यश आले. सदर घटना तालुक्यातील फुलेनगर शिवारात मंगळवारी (दि.७) सायंकाळी घडली. फुलेनगर थापा शिवारात बांधलेला ज्ञानेश्वर राऊत यांचा बैल सायंकाळी अचानक सुटला. सैरावैरा धावत सुटलेला बैल उभ्या पिकाची नासाडी करेल म्हणून त्याला पकडण्यासाठी राऊत यांचा बारा वर्षीय मुलगा अथर्व बैलामागे धावत गेला. बैलाचा दोर धरतांना तो हातातून निसटला. खाली वाकून दोर उचलण्याच्या प्रयत्नात असतांना, त्याच ठिकाणी गारव्याला पडून असलेला कोब्रा अथर्वच्या हातात आला. काहीही कळण्याच्या आत त्याच्या दोन्ही हातांना नागाने कडकडून दंश केला. त्याला उपचारासाठी तातडीने नांदगांव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉ. रोहन बोरसे यांनी अथर्वला काही तासात तब्बल २३ प्रतिविषा (एएसव्ही) ची इंजेक्शन्स दिली. मात्र दुसºया दिवशी त्याला भेटायला आलेले सर्पमित्र प्रभाकर निकुंभ यांना अथर्वची प्रकृती गंभीर होत चाललयाची शंका आल्याने तात्काळ डॉ. बोरसे यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी पुन्हा प्रतिविषाचे १३ डोस दिले. यावेळी राऊत कुटुंबातील सर्वच सुन्न झाले होते. त्यानंतर दैव बलवत्तर होते म्हणून अथर्वचे प्राण वाचले असले तरी नागाने चावा घेतल्याने डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.