रणरणत्या उन्हाळ्यात कोळुष्टी टँकरमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 04:06 PM2019-05-29T16:06:02+5:302019-05-29T16:06:32+5:30
पेठ -एका बाजूला दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्रात पाणी मिळवण्यासाठी गावखेड्यातील लोकांना करावे लागत असलेले जीवघेणे प्रयत्न माध्यमांमधून प्रसिद्ध होत आहेत. परंतु त्याच वेळी दुसर्या बाजूला ऐन उन्हाळ्यात आपल्या दारात पाणी आल्याने पेठ तालुक्यातील कोळुष्टीचे गावकरी मात्र आनंदाने जल्लोष करत आहेत. ही विरोधाभासी किमया घडवली आहे सोशल नेटवर्किंग फोरमने. अलीकडेच पूर्णत्वास गेलेला हाच पाणी प्रकल्प काल गावकर्यांकडे सुपूर्द करण्यात आला.
पेठ -एका बाजूला दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्रात पाणी मिळवण्यासाठी गावखेड्यातील लोकांना करावे लागत असलेले जीवघेणे प्रयत्न माध्यमांमधून प्रसिद्ध होत आहेत. परंतु त्याच वेळी दुसर्या बाजूला ऐन उन्हाळ्यात आपल्या दारात पाणी आल्याने पेठ तालुक्यातील कोळुष्टीचे गावकरी मात्र आनंदाने जल्लोष करत आहेत. ही विरोधाभासी किमया घडवली आहे सोशल नेटवर्किंग फोरमने. अलीकडेच पूर्णत्वास गेलेला हाच पाणी प्रकल्प काल गावकर्यांकडे सुपूर्द करण्यात आला. या लोकार्पण सोहळ्यास खास अमेरिकेतून आलेले उद्योजक वसंत राठी, किशोर राठी, डॉ. अभिजीत राठी, फोरमचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
व्यवसायासाठी अमेरिकेत रहात असताना एसएनएफ आदिवासी भागात करत असलेल्या कामाची योगेश कासट यांच्याकडून माहिती मिळाली. त्यामुळे कोळुष्टी सारख्या दुर्गम गावाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मदत करता आली. या गावकर्यांच्या चेहर्यावरील आनंद बघणे हा आयुष्यभरासाठी अमूल्य ठेवा आहे असे राठी यांनी कार्यक्र मात बोलताना सांगितले.
गेल्या कित्येक वर्षांपासून उन्हाळ्यात दोन तीन किलोमीटरवरून डोक्यावर पाणी आणावे लागायचे. आमचे हे कष्ट राठी बंधू आणि फोरमच्या लोकांनी वाचवले याबद्दल त्यांचे आभार कसे मानावे हेच कळत नाही अशी प्रतिक्रि या ग्रामपंचायत सदस्य शेवंता बोरसे यांनी दिली. गावकऱ्यांचे श्रमदान, टीम फोरमचे तांत्रिक ज्ञान, आण िलोकसहभागातून आर्थिक मदत या एसएनएफ पॅटर्नच्या त्रिसूत्रीतून हे काम पूर्ण करण्यात आले. अॅडव्हान्स एन्झाईम्स या कंपनीने कोळुष्टी पाणी प्रकल्पासाठी देणगी दिली. ग्रामपंचायतनेही पाण्याची टाकी बांधली. सर्वांच्या एकत्रीत प्रयत्नातून चार मिहन्यात हा प्रकल्प पूर्ण करु न अतिशय ऊत्साहात लोकार्पण करण्यात आले. रामदास शिंदे यांनी सुत्रसंचलन तर संदिप बत्तासे यांनी आभार मानले.