नाशिकच्या मविप्र वैद्यकिय महाविद्यालय रुग्णालयातील व्हेंटिलेटरमध्ये आढळले झुरळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 10:48 PM2018-04-24T22:48:41+5:302018-04-24T22:48:41+5:30
रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप
नाशिक : आडगावमधील वैद्यकिय महाविद्यालय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात एका अत्यवस्थ महिला रुग्णाला कृत्रिम श्वासोच्छवासासाठी व्हेंटिलेटर लावण्यात आलं होतं. मात्र या व्हेंटिलेटरमध्ये चक्क झुरळ फिरत असल्याचं नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलं. या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ४५ वर्षीय महिला अंजली शंकर बैरागी (४२, रा. मालेगाव स्टॅन्ड) यांच्या प्रकृतीत दोन दिवसांत सुधारणा झाली होती. मात्र रुग्णालयाच्या वैद्यकीय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झालाचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मुलगा धीरज बैरागी याने रुग्णालयाचा हलगर्जीपणा व व्हेंटिलेटर बदलण्याच्या प्रकारामुळे अंजली बैरागी यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी रुग्णालय प्रशासनावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.