आचारसंहितेने ग्रामपंचायतीच्या मुसक्या आवळल्या, प्रचारावर निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 05:14 PM2017-09-08T17:14:25+5:302017-09-08T17:14:35+5:30

Code of Conduct grants the gram panchayat's permission, restriction on promotion | आचारसंहितेने ग्रामपंचायतीच्या मुसक्या आवळल्या, प्रचारावर निर्बंध

आचारसंहितेने ग्रामपंचायतीच्या मुसक्या आवळल्या, प्रचारावर निर्बंध

Next


नाशिक : जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन उमेदवारांकरवी नामांकन भरले जात असताना या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता अधिकाधिक कडक करून राजकीय पक्ष व त्यांच्या उमेदवारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. जाहीर प्रचारावर निर्बंध लावतांनाच, उमेदवारी दाखल करण्यासाठी फक्त तीनच कार्यकर्त्यांना मुभा देण्यात आली आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणुकीचे नामांकन आॅनलाइन पद्धतीने भरण्याची सक्ती करण्यात आली असून, यंदा सरपंचाची निवडणूक थेट जनतेतून घेण्यात येणार असल्याने त्यादृष्टीने गावातील भाऊबंदकी, राजकीय वैमनस्य या सर्व गोष्टींचा विचार करीत आयोगाने आचारसंहितेच्या माध्यमातून त्यावर निर्बंध आणले आहेत. ज्या जिल्ह्यातील एकूण गावांच्या ५० टक्के ग्रामपंचायतींच्या निवडणुका असतील त्या संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता जारी करण्याचा तर ज्या तालुक्यातील ५० टक्के ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील त्या तालुक्यात संपूर्ण आचारसंहिता जारी करण्यात येणार असून, सध्या ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत त्या ग्रामपंचायतीला लागून असलेल्या गावांमध्येदेखील आचारसंहिता जारी राहणार आहे. ज्या ठिकाणी निवडणुका आहेत त्या ठिकाणी आचारसंहिता जारी असेल, अन्यत्र विकासकामे करण्यास कोणतीही हरकत आयोगाने ठेवली नसली तरी, लगतच्या मतदारांवर प्रभाव पडेल असे कोणतेही कृत्य करण्यास मात्र मज्जाव करण्यात आला आहे.
ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यापासून ते मतमोजणी पूर्ण होईपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाºयाच्या कार्यालयाच्या शंभर मीटर परिसरात जमावबंदी लागू करण्यात येणार असून, नामांकन भरण्यास येणाºया उमेदवारासोबत फक्त तीन व्यक्तींनाच निवडणूक अधिकाºयाच्या दालनात प्रवेश असणार आहे. गावाचे क्षेत्र तसेच लोकसंख्या मर्यादित असल्यामुळे ग्रामपंचायतीत उमेदवारी करणाºया उमेदवाराला प्रभागात फक्त एकच प्रचार कार्यालय उघडण्यास अनुमती असून, प्रचारासाठी वाहन व कार्यकर्त्यांची गरज नसल्याचे आयोगाने म्हटले आहे; मात्र उमेदवाराने मागणी केल्यास एक चारचाकी किंवा दोन दुचाकी वाहने प्रचारासाठी वापरता येतील त्याची रीतसर परवानगी घ्यावी लागणार आहे व एका उमेदवाराने वापरलेले वाहन दुसरा उमेदवार प्रचारासाठी वापरू शकणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Code of Conduct grants the gram panchayat's permission, restriction on promotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.