आचारसंहितेची अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:14 AM2018-04-26T00:14:09+5:302018-04-26T00:14:09+5:30

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सहा स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या अर्थात स्वराज्य संस्थेच्या आमदारकीच्या निवडणुकीचा बिगूल वाजला आणि २० एप्रिलपासून आचारसंहिता अंमलबजावणी सुरू झाली असून, २९ मे पर्यंत लागू राहणार आहे.

 Code of Conduct Implementation | आचारसंहितेची अंमलबजावणी

आचारसंहितेची अंमलबजावणी

googlenewsNext

येवला : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सहा स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या अर्थात स्वराज्य संस्थेच्या आमदारकीच्या निवडणुकीचा बिगूल वाजला आणि २० एप्रिलपासून आचारसंहिता अंमलबजावणी सुरू झाली असून, २९ मे पर्यंत लागू राहणार आहे.  येवला शहर हद्दीतील सर्वच उद्घाटनाचे फलक कागदाने झाकण्याची मोहीम येवला पालिकेने सोमवारी सकाळीच सुरू केली. पालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ असणारे फलक झाकण्यात आले आहे. येथील सेनापती तात्या टोपे स्मारकचा उद्घाटनाचा फलक झाकण्यासह अन्य कामे पालिका कर्मचाऱ्यांनी केली. मतदार प्रभावित होऊ नये म्हणून शहर हद्दीतील सर्वच राजकीय पक्षांचे फलक, उद्घाटनाच्या कामाचे फलक झाकण्याचे काम केले जात आहे. येवला पालिका मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार पालिका कर्मचाºयांची तातडीची बैठक घेऊन आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी काय व कसे काम करायचे याबाबत मार्गदर्शन केले.  मुळातच पालिकेची सर्वच कामे ठप्प असताना आचारसंहिता लागली. आता तर आचारसंहिता लागू झाल्याने येवला पालिकेची सर्वच कामे ठप्प राहणार आहेत. त्यामुळे परिस्थितीत काहीही बदल नसला तरी आता काम होत नाही अशी ओरड किमान आचारसंहिता असल्याने करता येणार नाही. ज्या कामांचे कार्यारंभ आदेश निघाले आहेत त्या कामांना अडचण येणार नाही. नवीन प्रस्तावित कामे करण्याचा विचार असलाच तर या कामांना मात्र फटका बसणार आहे. पालिका अध्यक्ष यांच्यासह सर्वच पदाधिकाºयांची शासकीय वाहने पालिकेने जमा करून घेतली आहे. निवडणुकीसाठी पूर्ण जिल्ह्याला आदर्श निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे.
मुख्याधिकायांच्या सूचना
निवडणुकीवर परिणाम करणारे गावातील सर्व प्रकारचे फलक काढून घेणे, शासकीय मालकीची वाहने ताब्यात घेणे, रॅलीसह विविध कार्यक्र माच्या अधिकृत परवानग्या काढणे याबाबतच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आल्याची माहिती मुख्याधिकारी यांनी दिली. सर्व कामे तत्परतेने करण्याचे सूचित केले. नवीन प्रस्तावित कामे करण्याचा विचार असलाच तर या कामांना मात्र फटका बसणार आहे.

Web Title:  Code of Conduct Implementation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.