मालेगावी पाच जणांविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
By Admin | Published: April 23, 2017 01:56 AM2017-04-23T01:56:17+5:302017-04-23T01:56:28+5:30
मालेगाव : महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता भंगचा पहिला गुन्हा मालेगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला
मालेगाव : महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता भंगचा पहिला गुन्हा मालेगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल व जनता दलाचे नगरसेवक बुलंद एकबाल यांच्यासह पाच जणांविरुद्ध आचार संहिता भंग व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार योगेश शिरसाठ यांनी फिर्याद दिली आहे. शहरातील मुशावरत चौकात मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल, जनता दलाचे नगरसेवक बुलंद एकबाल, मुस्तकीम डिग्निटी, मौलाना अशरफी, हाजी युसूफ मो. यासीन, शमशेर अहमद मुस्लीम धांड्या अशा सात जणांनी आचार संहितेचा भंग करीत गायक सोनू निगम व काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला शाई लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)