प्राथमिक शिक्षकाविरुद्ध अचारसंहिता भंगाची तक्रार
By admin | Published: January 25, 2017 12:47 AM2017-01-25T00:47:07+5:302017-01-25T00:47:23+5:30
प्राथमिक शिक्षकाविरुद्ध अचारसंहिता भंगाची तक्रार
नांदगाव : नवसारी येथील प्राथमिक शिक्षकाकडून आचारसंहितेचा भंग केला जात असल्याची तक्र ार नांदूर येथील भाऊसाहेब व्हडगळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तक्रारींची प्रत तहसीलदार, गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली आहे.
तालुक्याच्या पंचायत समितीच्या माजी उपसभापती सुरक्षा केसकर यांचे पती असलेले तुकाराम केसकर यांचा राजकारणातील हस्तक्षेप थांबवावा यासाठी व्हडगळ यांनी आपल्या तक्र ारीत मागणी करताना केसकर यांच्या विरु द्ध कारवाइची मागणी केली आहे. पानेवाडी गणाच्या इच्छुक असलेल्या उमेदवार सुरक्षा केसकर यांचे पती तुकाराम केसकर नवसारी येथील प्राथमिक शाळेत असून ते राजकीय पक्षाचे राजरोस काम करीत असतात निवडणूक होईपावेतो त्यांना नांदगाव तालुक्याबाहेर पाठविण्याची व्यवस्था करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे . दरम्यान, आपल्या विरोधात राजकीय आकसापोटी तक्र ार करण्यात आली असून सध्या कुणाच्याही उमेदवारी जाहीर झाल्या नसताना आपण प्रचार करीत असतो हे धांदात खोटे आहे. आपण नियमित आपले कर्तव्य बजाविले आहे. केवळ आपली पत्नी पंचायत समितीची पदाधिकारी होती हा एवढाच मुद्दा घेऊन अशी तक्र ार करण्यात आल्याचा खुलासा त्यांनी केला. दरम्यान व्हडगळ यांच्या तक्र ार अर्जाची दाखल घेत अभिप्रायासाठी ते तालुक्याच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले असून अभिप्राय आल्या नंतर जिल्हाधिकाऱ्यांना तसे कळविले जाणार असल्याची माहिती तहसीलदार चंद्रकांत देवगुणे यांनी दिली .