पांडाणेत कावडीधारकांची मिरवणूक
By admin | Published: December 16, 2015 11:26 PM2015-12-16T23:26:12+5:302015-12-16T23:28:55+5:30
पांडाणेत कावडीधारकांची मिरवणूक
पांडाणे : येथील जय खंडेराव मित्रमंडळातर्फे चंपाषष्टीनिमित्त कावडीने चांदोरी (ता. निफाड) येथे जल आणण्यासाठी खंडेराव मंदिराचे पुजारी बाळूवाघ व संजय गांगुर्डे भाऊसाहेब वाघ व ग्रामस्थ मोठ्या संखेने चांदोरी गावाकडे निघाले आहेत. चांदोरी सुकेणा, पिंपळगाव जवळके वणी, खेडेगाव, तिसगावफाटा वणी पांडाणे असा एकदिवस व एक रात्र सतत चालत साठ ते पासष्ट किलोमिटरचा प्रवास हे खंडेराव भक्त एक दिवसात करून चंपाषष्टीच्या दिवशी सर्वतीर्थने ग्रामदेवातांचे स्नान घालून पुजन केले जाते व यात्रेला सुरवात होते.
सायखेड्यात उत्सव
निफाड : तालुक्यातील मौजे सायखेडा येथे श्रीखंडेराव महाराज (मार्तंडदेव) यांच्या मंदिरात चंपाषष्टीनिमित्त गुरूवारी यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त आयोजित करण्यातआलेल्या पालखीत सहभागी होण्याचे आवाहन देवस्थानचे वहीवाटदार शरद भांड यांनी केले आहे. (वार्ताहर)