थंडीमुळे पिके तरारली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 02:46 PM2020-02-07T14:46:22+5:302020-02-07T14:46:30+5:30
नायगाव - गेल्या आठवड्यापासून थंडीचे पुन्हा आगमन झाल्याने रब्बीचे सर्वच पिके तरारली आहे.गहू व हरभरा पिकाचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.
नायगाव - गेल्या आठवड्यापासून थंडीचे पुन्हा आगमन झाल्याने रब्बीचे सर्वच पिके तरारली आहे.गहू व हरभरा पिकाचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. वातावरणात बदल होऊन थंडीचे पुन्हा आगमन झाले आहे.सततचे ढगाळ हवामान व दुपारी उन्हाच्या चटक्यांनी शेतातील पिके पिवळे पडुन खराब होऊ लागले होते.या खराब हवामानामुळे शेतकऱ्यांना गव्हु,हरभरा ,कांदा,टमाटे,कोबी व फ्लावर आदी पिकांवर मोठ्या प्रमाणावर किड,मावा,तुडतुडे,चिकटा आदी विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत होता.त्यामुळे शेतकर्यांना दररोज महागड्या औषधांच्या फवारण्या कराव्या लागत होत्या.
दररोज वातावरणात कधी ढगाळ तर कधी तीव्र उन्हाचे चटके अशा प्रकारच्या वातावरणामुळे शेतकरी हैराण झाला होता.अचानक गायब झालेल्या थंडीमुळे रब्बीच्या सर्वच पिकांचे पिवळे पडुन नुकसान होण्यास सुरवात झाली होती.दरम्यान गेल्या आठवड्या पासून वातावरणात कमालीचा गारवा वाढल्याने पिकांची विविध रोगांपासून मुक्तता होण्यास मदत झाली आहे.दररोज सकाळ-संध्याकाळी पडणा-या थंडीमुळे दिवसभर वातावरणात गारवा जाणवत आहे.त्यामुळे रब्बीचे सर्वच पिके सध्या तरारली आहे.
सध्याचे वातावरण शेती पिकांना पोषक असल्यामुळे शेती-शिवारातील अन्य पिकांबरोबर गव्हु व हरभ-यांचे पिके तरारली आहे.सध्या असलेले वातावरण आणखी पंधरा दिवस टिकून राहिले तर गव्हा बरोबर हरभ-याचे उत्पादन वाढण्याची शेतकऱ्यांना आशा आहे.
----------------------
यंदाच्या वर्षी वरूणराजाने चांगली क्रु पाद्रूष्टी केल्याने आजही गावातल्या सर्वच नद्यांना पाणी झुळ-झुळत आहे.परिणामी विहिरींची पाणी पातळी वाढलेली आहे.त्यामुळे येरवी जानेवारीनंतर भकास दिसणारा नायगाव खोरा यंदा फेब्रुवारी मिहण्यातही हिरवागार दिसत आहे.