थंडीचा जोर झाला कमी; नाशिककरांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 04:04 PM2018-12-24T16:04:15+5:302018-12-24T16:07:32+5:30

गेल्या वर्षी डिसेंबरच्या २९ तारखेला ७.५ अंश इतके किमान तपमान नोंदविले गेले होते. यावर्षी ७.९ ही हंगामातील सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली.

Cold fall; Relief for Nashik | थंडीचा जोर झाला कमी; नाशिककरांना दिलासा

थंडीचा जोर झाला कमी; नाशिककरांना दिलासा

Next
ठळक मुद्देरुग्णसंख्या नियंत्रणात येण्याची शक्यता किमान तपमानाचा पारा १२.२अंशापर्यंत वर सरकला

नाशिक : मागील दहा दिवसांपासून नाशिककर कडाक्याच्या थंडीने गारठले होते. या हंगामात नाशिकच्या किमान तपमानाचा पारा ७.९अंशापर्यंत खाली घसरला. हंगामातील ही सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली. वाढत्या थंडीच्या कडाक्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागल्याने थंडीपासून दिलासा कधी मिळेल? याची प्रतीक्षा नागरिक करत होते. दोन दिवसांपासून किमान तपमानाचा पारा वाढू लागल्यामुळे थंडीची तीव्रताही कमी झाल्याचा अनुभव नागरिकांना येऊ लागला आहे.
आठवडाभरापासून शहराच्या किमान तपमानाचा पारा दहा अंशाच्या खाली स्थिरावत होता. यामुळे थंडीची तीव्रता अधिक जाणवत होती. बुधवारी (दि.१९) पारा अचानकपणे ७.९ अंशापर्यंत खाली घसरला होता. मागील वर्षाच्या नीचांकी तपमानाचा विक्रम यावर्षी लवकरच मोडित निघण्याची चिन्हे दिसू लागली होती; मात्र ७.९ अंशापर्यंत पारा खाली घसरला. त्यानंतर पुन्हा किमान तपमानाचा पारा वर येऊ लागल्याने थंडीची तीव्रताही हळुहळु कमी होत चालली आहे. सोमवारी (दि.२४) किमान तपमानाचा पारा १२.२अंशापर्यंत वर सरकला. मंगळवारी किमान तपमान ११.२ तर कमाल तपमान ३० अंश इतके नोंदविले गेले होते. एकूणच कमाल तपमानाचा पारादेखील २५ अंशावरुन पुढे सरकत असल्याने थंडीचा जोर सध्या कमी झाला आहे. कमाल तपमान तीस अंशापर्यंत आले असून किमान तपमानदेखील १२अंशापर्यंत आल्याने थंडीची तीव्रता कमी झाल्याचा नागरिक अनुभव घेत आहे. सोमवारी दुपारपासून ढगाळ हवामान शहरात दाटल्यामुळे कमाल तपमानात वाढ होऊन थंडी गायब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कमाल तपमानाचा पारा अधिक वर सरकण्याची चिन्हे आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरच्या २९ तारखेला ७.५ अंश इतके किमान तपमान नोंदविले गेले होते. यावर्षी ७.९ ही हंगामातील सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली.
थंडीच्या काडाक्याने शहरासह ग्रामीणभागदेखील गारठला होता. निफाड, इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, पेठ, दिंडोरी या तालुक्यांमध्येही थंडीची तीव्रता अधिक जाणवत होती. द्राक्ष बागायतदार थंडीच्या कडाक्यामुळे धास्तावले होते.
दिवसभर नागरिकांना बोचऱ्या थंड वा-याचा सामना करावा लागत होता. त्यामुळे नागरिक दिवसभर ऊबदार कपडे परिधान करुन बोचºया वाºयापासून बचाव करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत होते; मात्र दोन दिवसांपासून थंडीचा जोर कमी झाल्याने आता चित्र बदललेले पहावयास मिळत आहे. थंडीचा कडाक्यामुळे शहरात सर्दी-पडशासह, तापाचे रुग्णही वाढले होते. सरकारी व खासगी दवाखान्यांमध्ये या आजाराच्या तक्रारी घेऊन येणा-यांची संख्या तापमान वाढल्याने नियंत्रणात येण्याची शक्यता आहे.

Web Title: Cold fall; Relief for Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.