थंडी पुन्हा वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:23 AM2021-02-06T04:23:20+5:302021-02-06T04:23:20+5:30
गोंदे-सोनेवाडी रस्त्याची दुरस्ती सिन्नर: सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गोंदे फाटा ते सोनेवाडी व सिन्नर आणि अकोले अशा दोन तालुक्यांना जोडणाऱ्या ...
गोंदे-सोनेवाडी रस्त्याची दुरस्ती
सिन्नर: सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गोंदे फाटा ते सोनेवाडी व सिन्नर आणि अकोले अशा दोन तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. समृध्दी महामार्गाच्या कामामुळे अवजड वाहनांची वर्दळ असल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली होती. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मनसेने निवेदन दिले होते. त्यानंतर या कामाला प्रारंभ करण्यात आला.
औद्योगिक वसाहतीजवळील रस्त्याची दुरवस्था
सिन्नर: तालुका औद्योगिक वसाहतीच्या (स्टाइस) कडेला पश्चिमेकडे असलेल्या उपनगरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या भागात उज्ज्वलनगर, शंकरनगर, गणेशनगर या भागात मुसळगाव शिवारातील नागरिकांचे व औद्योगिक वसाहतील कामगारांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या रस्त्याची दुरवस्था झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.
संविधान दिन निबंध स्पर्धेचे निकाल जाहीर
सिन्नर: महाराष्ट्र राज्य राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषदेच्या नाशिक विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या संविधान दिन ऑनलाइन निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. नाशिक विभागासाठी या स्पर्धेचे आयोजन केले होते. विभागातील प्रत्येक जिल्ह्यात तीन क्रमांक काढण्यात आले. नाशिक येथे नामदेव शेवाळे, वैभव अलई, गोरक्षनाथ तैलारे यांनी क्रमांक मिळविला. नाशिक विभागीय स्तरावर नितीन ठुबे, प्राजक्ता पाटील, जयेश ठाकरे यांनी बाजी मारली.
२०० शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यांना स्थगिती
सिन्नर: पीएम किसान योजनेत अपात्र लाभार्थी शेतकऱ्यांकडून त्यांच्या बॅँक खात्यावर जमा रकमेची सरकारकडून वसुली सुरू आहे. प्रशासनाला प्रतिसाद न देणाऱ्या शेतकऱ्यांचे बॅँक खाते स्थगित करण्याची कारवाई प्रशासनाने हाती घेतली आहे. २२ गावांतील २०० शेतकऱ्यांची बॅँक खाती स्थगित केल्यानंतर अपात्र लाभार्थ्यांत चांगलीच खळबळ उडाली आहे. तहसीलदार राहुल कोताडे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्टोबर महिन्यात २०० अपात्र लाभार्थ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतरही काही शेतकऱ्यांनी परतावा न केल्यामुळे त्यांच्यावर कारवाईचे हत्यार उपसण्यात आले आहे.