गारठा वाढला, किमान तापमानात घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 09:35 IST2025-01-03T09:35:16+5:302025-01-03T09:35:32+5:30

गुरुवारी किमान तापमानाचा पारा १३.४ अंशांपर्यंत घसरला. 

Cold increases, minimum temperature drops | गारठा वाढला, किमान तापमानात घसरण

गारठा वाढला, किमान तापमानात घसरण

नाशिक : शहर व परिसरात मागील पंधरवड्यापासून थंडीचा कडाका गायब झाला होता. नववर्षाला प्रारंभ होताच शहरात थंडीचे पुनरागमन होऊ लागले आहे. बुधवारी रात्रीपासूनच हवेत गारवा निर्माण झालेला जाणवत होता. गुरुवारी किमान तापमानाचा पारा १३.४ अंशांपर्यंत घसरला. 

शुक्रवारपासून  पुढील पाच ते सहा दिवस उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, नंदुरबार, धुळे, जळगावसह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, विदर्भातील अमरावती, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांत थंडीचा प्रभाव अधिक तीव्रतेने जाणवणार असल्याचे हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी सांगितले.  
 उत्तरेतील थंडी आता महाराष्ट्राकडे सरकली असून बुधवारी रात्रीपासूनच हवेत गारवा निर्माण झालेला जाणवत होता. 
 

Web Title: Cold increases, minimum temperature drops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक