पहिल्याच दिवशी कडाक्याच्या थंडीचा सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 01:54 AM2020-12-22T01:54:47+5:302020-12-22T01:55:14+5:30
दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशकातून निघालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जत्थ्याला पहिल्याच दिवशीच्या मुक्कामाला कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागला. येथे पोहोचलेल्या जत्त्थ्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांची गुंजाळ शाळेमध्ये मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली असून, त्यांनी घरून आणलेल्या पांघरुणाच्या आधारेच थंडीशी सामना करीत रात्र काढली.
चांदवड : दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशकातून निघालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जत्थ्याला पहिल्याच दिवशीच्या मुक्कामाला कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागला. येथे पोहोचलेल्या जत्त्थ्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांची गुंजाळ शाळेमध्ये मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली असून, त्यांनी घरून आणलेल्या पांघरुणाच्या आधारेच थंडीशी सामना करीत रात्र काढली.
चांदवडला पोहोचल्यानंतर गुंजाळ शाळेमध्ये शेतकऱ्यांनी स्वत:सोबत आणलेल्या शिधेद्वारे मसाले भात शिजवून त्याचा आस्वाद घेतला. अनेकांनी रात्री उशीरापर्यंत शेकोटीची ऊब घेऊन रात्र काढली. काही शेतकरी लगतच्या गावांमध्ये मुक्कामास गेले असून ते मंगळवारी सकाळी पुन्हा मोर्चात सहभागी होवून धुळ्याकडे प्रस्थान करतील. जाताना सकाळी उमराणे येथे त्यांच्या नास्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
बिऱ्हाड पाठीवर, शिदोरी सोबत
n तीन दिवस प्रवास करून दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपली शिदोरी सोबत घेऊन प्रवासाला सुरुवात केली आहे. शिवाय चांदवड, शिरपूर अशा ठिकाणी तेथील स्थानिक शेतकऱ्यांनीही काही आंदोलकांच्या निवासाची आणि भोजनाची सोय केली आहे.
n शेतीविरोधातील या एल्गारमध्ये आदिवासी भागातील युवक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर ज्येष्ठ व महिला देखील सहभागी झाल्या आहेत.