थंडीची चाहूल; पहाटे धुक्याची चादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:42 AM2017-10-25T00:42:28+5:302017-10-25T00:42:33+5:30
शहरात गेल्या तीन-चार दिवसांपासून थंडी जाणवू लागली असून, नाशिककरांना गरम कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. गार वारे आणि पहाटे पडणाºया धुक्यामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. विशेषत: पहाटे आणि सायंकाळी थंडीची अनुभूती येत आहे.
नाशिक : शहरात गेल्या तीन-चार दिवसांपासून थंडी जाणवू लागली असून, नाशिककरांना गरम कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. गार वारे आणि पहाटे पडणाºया धुक्यामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. विशेषत: पहाटे आणि सायंकाळी थंडीची अनुभूती येत आहे. शहराचे कमाल तपमान ३० अंशांच्या पुढे व किमान तपमान २० अंशांच्या आसपास राहत होते; मात्र मंगळवारी (दि.२४) किमान तपमानाचा पारा थेट १३.४ अंशांवर घसरला तर कमाल तपमानाचा पारा ३२.४ अंशांवर स्थिरावला. सोमवारी किमान तपमान १९ अंश इतके होते. एकूणच तपमानात होणारी कमी-जास्त वाढ व हवामानात झालेला बदल नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करणारा ठरत आहे. संध्याकाळनंतर हवेत गारवा निर्माण होण्यास सुरुवात होते, तर रात्री थंडीचा कडाका जाणवतो. पहाटेदेखील थंडीची तीव्रता अधिक जाणवते; मात्र सूर्योदयानंतर उन्हाचा कडाका जाणवण्यास सुरुवात होते. दिवसभर आॅक्टोबर हिटचा तडाखा नागरिकांना जाणवत आहे. हवामान बदल आणि शहरात वाढती अस्वच्छता यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.