पाटोदा परिसरात थंडीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 05:09 PM2018-12-17T17:09:45+5:302018-12-17T17:10:55+5:30
पाटोदा : गेल्या चार पाच दिवसांपासून पाटोदा परिसरात थंडीचा जोर वाढला आहे त्यामुळे परिसरात सकाळ संध्याकाळ शेकोट्या पेटू लागल्या असून शेकोटी भोवती गप्पा रंगू लागल्या आहे.
पाटोदा : गेल्या चार पाच दिवसांपासून पाटोदा परिसरात थंडीचा जोर वाढला आहे त्यामुळे परिसरात सकाळ संध्याकाळ शेकोट्या पेटू लागल्या असून शेकोटी भोवती गप्पा रंगू लागल्या आहे.
गेल्या तीन चार दिवसांपासून बोचऱ्या वाºयामुळे थंडीचा त्रास वाढला आहे. वाºयामुळे दिवसभरही हवेत गारवा राहात असल्याने नागरिकांच्या दिनचर्येतही बदल झाला आहे. थंडीमुळे सर्दी खोकला यासारखे आजारही वाढले आहे.
परिसरातील पालखेड डावा कालवा लाभक्षेत्रातील काही गावांमध्ये कांदा लागवड झालेली असल्यामुळे या थंडीचा फायदा पिकांना होणार आहे. थंडीमुळे पिकांना पोषक वातावरण निर्माण होत आहे. तसेच पिकांवरील रोगांवर देखील थंडीमुळे नियंत्रण येत असल्याचे शेतकºयांनी सांगितले. थंडीमुळे उबदार कपड्यांच्या मागणीत मोठया प्रमाणात वाढ झाली आहे.