जिल्ह्यात थंडीचा कडाका; उबदार कपड्यांचा आसरा शेतीकामांवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:41 PM2017-11-12T23:41:59+5:302017-11-13T00:12:26+5:30
देवळा तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा जोर वाढला असून, गुलाबी थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी उबदार कपड्यांचा आसरा घेतला आहे.
मेशी : देवळा तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा जोर वाढला असून, गुलाबी थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी उबदार कपड्यांचा आसरा घेतला आहे.
यावर्षी परतीचा पाऊस जोरदार झाला असल्याने अजूनही ओढे, नाले पाण्याने वाहत आहेत. त्यामुळे थंडी जास्त असेल असा कयास जाणकार व्यक्त करीत होतेच. सध्या कांदा लागवड, गहू पेरणी, हरबरा पेरणी आदी कामे जोरात सुरू आहेत. लाल कांदा काढणेही सुरू असून, थंडीमुळे उशिरा कामे केली जात आहेत. यावर्षी गव्हाचे क्षेत्र वाढले आहे. हवामान चांगले राहिल्यास उत्पादन वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या थंडीमुळे शेतीच्या कामांना उशिरा सुरुवात केली जात आहे. याबरोबरच मजुरांचा तुटवडा भासत आहे. सगळीकडे उबदार कपडे घालून व शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करताना आबालवृद्ध दिसत आहेत. थंडीमुळे शेतीच्या कामांवर परिणाम होत आहे. थंडीचा जोर अजून वाढणार असेच चित्र आहे.