नाशिकला थंडीचा कडाका; तपमानाचा पारा ८.५अंशापर्यंत घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 02:45 PM2018-12-17T14:45:57+5:302018-12-17T14:47:49+5:30

आठवडाभरापासून नाशिककर वाढत्या थंडीने गारठले असून तपमानाचा पारा सातत्याने दहा अंशाच्या खाली राहत आहे. एका दिवसात दोन अंशांनी तपमानात घट होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Cold wave hits Nashik; Temperatures dropped by up to 8.5 degrees | नाशिकला थंडीचा कडाका; तपमानाचा पारा ८.५अंशापर्यंत घसरला

नाशिकला थंडीचा कडाका; तपमानाचा पारा ८.५अंशापर्यंत घसरला

Next
ठळक मुद्दे या हंगामातील आजची नोंद ही नीचांकी ठरली.आठवडाभरापासून नाशिककर वाढत्या थंडीने गारठले

नाशिक : किमान आणि कमाल तपमानात सातत्याने घसरण सुरूच असून शहरात थंडीचा कडाका कायम आहे. रविवारी (दि.१६) १०.५ इतके किमान तपमान तर २५.८ इतके कमाल तपमान नोंदविले गेले होते; मात्र आज सोमवारी सकाळी किमान तपमान८.५इतके मोजण्यात आले. या हंगामातील आजची नोंद ही नीचांकी ठरली. आठवडाभरापासून नाशिककर वाढत्या थंडीने गारठले असून तपमानाचा पारा सातत्याने दहा अंशाच्या खाली राहत आहे. एका दिवसात दोन अंशांनी तपमानात घट होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत ९.४ अंश इतकी या हंगामातील नीचांकी नोंद ठरली होती.
नाशिककरांना पहाटेपासून दुपारपर्यंत हुडहुडी जाणवत होती. संध्याकाळी पाच वाजेनंतर पुन्हा गारवा वाढण्यास सुरूवात होते. रात्री उशिरापर्यंत हुडहुडी नागरिकांना सहन करावी लागत आहे. मागील सहा दिवसांपासून शहराचे किमान तपमान दहा अंशाच्या आसपास स्थिरावत आहे. गेल्या मंगळवारी (दि.११) हंगामातील नीचांकी ९.४ इतक्या तपमानाची नोंद झाली होती. त्यानंतर सातत्याने तपमान दहा अंशाच्या जवळपास राहिले. किमान तपमान १०.५अंशापर्यंत खाली घसरल्याने रविवारी पहाटेपासून थंडीचा कडाका जाणवत होता. कमाल तपमानात मागील पाच दिवसांपासून घसरण सुरूच आहे. कमाल तपमान तीशीपार होते; मात्र आता थेट पंचवीशीपर्यंत खाली आल्याने वातावरणातील उष्मा संपुर्णत: गायब झाला असून थंडीची तीव्रता अधिकच वाढली आहे. सोमवारी किमान तपमानाचा पारा ८.५अंशापर्यंत घसरल्याने शहरात थंडीने कहर केला आहे. नाशिक शहरात ८.५ तर जिल्ह्यातील निफाड तालुक्यात पारा थेट ७.२ अंशापर्यंत खाली घसरला आहे. संध्याकाळी सात वाजेनंतर थंड वाऱ्याचा वेग वाढत असल्यामुळे किमान तपमानात घट होत आहे. उत्तर भारतासह जम्मु-काश्मिरमध्ये थंडीने हाहाकार माजविला असून किमान तपमान काश्मिर खोºयात उणे५पर्यत पोहचले असून उत्तर भारतात किमान तपमान ५ अंशापर्यंत खाली आले आहे. यामुळे उत्तर महाराष्टÑातही थंडीचा जोर वाढला आहे. पुण्यात ८.३ , जळगावमध्ये ८.४ नाशिकमध्ये ८.५ तर अहमदनगरमध्ये ८.७ इतक्या किमान तपमानाची सोमवारी सकाळी नोंद झाली. राज्यातील ही शहरे थंडीने गारठली आहेत. महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी किमान तपमान १०.४ तर साता-यात ११.४ इतके किमान तपमान नोंदविले गेले.
वाढत्या थंडीमुळे नागरिक पहाटे व रात्री शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. संध्याकाळी साडेसात वाजेनंतर शहरातील बाजारपेठांमध्येही शुकशुकाट मागील चार दिवसांपासून दिसून येत आहेत. संध्याकाळी सात वाजेनंतर रस्ते निर्मनुष्य होऊ लागतात. तसेच दिवसभर उबदार कपडे परिधान करण्यास नागरिक प्राधान्य देत आहेत. सहा ते सात दिवसांपासून शहर गारठले असून नागरिकांना थंडीचा सामना करावा लागत आहे. वाढत्या थंडीमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला असून सर्दी-पडशाचे रुग्ण वाढू लागले आहे.


नाशिकचे किमान तपमान दृष्टिक्षेपात
सोमवार (दि.१०) - १२.८
मंगळवार (दि.११) - ९.४
बुधवार (दि.१२) - ९.६
गुरूवार (दि.१३)- ११.०
शुक्रवार (दि.१४)- १०.४
शनिवार (दि.१५)- १०.६
रविवार (दि.१६)- १०.५
सोमवार (दि.१७)- ८.५



 

Web Title: Cold wave hits Nashik; Temperatures dropped by up to 8.5 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.