नाशिकला थंडीचा कडाका

By Admin | Published: January 5, 2017 02:23 AM2017-01-05T02:23:03+5:302017-01-05T02:23:16+5:30

नाशिकला थंडीचा कडाका

Cold wave in Nashik | नाशिकला थंडीचा कडाका

नाशिकला थंडीचा कडाका

googlenewsNext

नाशिक : थंडीच्या हंगामातील नाशिकचे सर्वांत नीचांकी तपमान १० डिसेंबरला ७.५ अंश इतके नोंदविले गेले होते. त्यानंतर प्रथमच बुधवारी (दि. ४) शहराच्या किमान तपमानाचा पारा ७.९ अंशापर्यंत घसरला. मंगळवारी ८.८ अंश इतके तपमान हवामान खात्याने नोंदविले होते. बुधवारी अहमदनगरनंतर सर्वाधिक कमी तपमान नाशिकला नोंदविण्यात आले. सोमवारनंतर शहराच्या किमान तपमानात सातत्याने घट होत असल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. सोमवारी शहराचे तपमान दहा अंशावर होते; मात्र दोन दिवसांतच पारा तीन अंशांनी घसरल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. नोव्हेंबर महिन्यापासून नाशिक राज्यात सर्वाधिक थंडीचे शहर म्हणून आघाडीवर होते. मंगळवारी (दि.३) शहराचे किमान तपमान ८.८ अंश इतके नोंदविले गेले. राज्यात नाशिकला सर्वांत कमी नीचांकी तपमानाची नोंद मंगळवारी हवामान खात्याकडून करण्यात आली होती. शहरात थंडीची लाट पुन्हा आली असून, नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. एका दिवसात दोन अंशांनी तपमानात घट झाल्याने नाशिककरांना पुन्हा थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. थंडीचा कडाका वाढल्याने नाशिककर घराबाहेर पडताना उबदार कपड्यांचा वापर करण्यास प्राधान्य देत आहेत.

Web Title: Cold wave in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.