निफाड तालुक्यात थंडीची लाट; पारा ८.४ अंशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 04:04 PM2017-12-21T16:04:34+5:302017-12-21T16:04:47+5:30
सायखेडा : निफाड तालुक्यात वाढत्या थंडीने पारा घसरला असून आज पहाटे ८.४ अंश सेल्सिअस इतकी नोंद करण्यात आली. यंदाची सर्वाधिक जास्त थंडी असल्याची नोंद करण्यात आली आहे.
सायखेडा : निफाड तालुक्यात वाढत्या थंडीने पारा घसरला असून आज पहाटे ८.४ अंश सेल्सिअस इतकी नोंद करण्यात आली. यंदाची सर्वाधिक जास्त थंडी असल्याची नोंद करण्यात आली आहे. यापेक्षा जास्त प्रमाणात थंडी पडते की काय या चिंतेने शेतकरी, नागरिक धास्तावले आहेत. मागील आठवड्यात ढगाळ वातावरण असल्याने वातावरणात उष्णता जाणवत होती मात्र आकाशातील ढगाळ वातावरण कमी झाल्याने अचानक तीन चार दिवसांपासून हवेत प्रचंड गारवा निर्माण झाला आहे. थंड हवामानामुळे दिवसा देखील गरम कपडे घालून नागरिक घराबाहेर पडत आहे तर अनेक ठिकाणी सायंकाळी सहा वाजता शेकोटी पेटवली जात आहे. थंडीची हुडहुडी भरल्याने ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर, जनावरे यांच्या जनजीवणावर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी शेतीची कामे ठप्प झाली आहे . रात्री ,पहाटे शेतात जाऊन शेतीला पाणी द्यावे लागते अशी परिस्थिती असली तरी वाढत्या थंडीने शेतकरी घरामध्ये रहाणे पसंत करत आहे. एक वर्षांपूर्वी निफाडचा पारा असाच घसरलेला होता, तेव्हा द्राक्ष पीक धोक्यात आले होते. भुरी नियंत्रणासाठी शेतकºयांना मोठी कसरत करावी लागली होती. दिवसादेखील शेकोटी पेटवली जात. त्याचीच पुनरावृत्ती होते की काय अशी धास्ती शेतकरी आणि नागरिकांनी घेतली आहे.