शहरात थंडीचा कडाका कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 01:11 AM2018-12-21T01:11:38+5:302018-12-21T01:12:06+5:30

आठवडाभरापासून शहराच्या किमान तापमानाचा पारा घसरत आहे. नाशकात थंडीचा जोर कायम आहे. ७.९ अंशांपर्यंत घसरलेला किमान तपमानाचा पारा गुरुवारी (दि.२०) ९.३ अंशांपर्यंत वर सरकला असला तरी गुरुवारी थंडीची तीव्रता जाणवत होती.

Cold wave prevails in the city | शहरात थंडीचा कडाका कायम

मागील दहा दिवसांपासून नाशिककर वाढत्या थंडीने गारठले असून, तापमानाचा पारा सातत्याने अधिक वेगाने खाली येऊ लागल्याने थंडीची तीव्रता अधिकच वाढली आहे. दिवसभर नागरिकांना बोचºया थंड वाºयाचा सामना करावा लागत आहे. गोदा घाटावर थंडीपासून संरक्षण करण्यासाठी शेकोटीभोवती बसलेले ज्येष्ठ नागरिक.

Next
ठळक मुद्देपारा ९.३ अंशांवर : बोचऱ्या थंड वाºयामुळे वातावरणात गारठा

नाशिक : आठवडाभरापासून शहराच्या किमान तापमानाचा पारा घसरत आहे. नाशकात थंडीचा जोर कायम आहे. ७.९ अंशांपर्यंत घसरलेला किमान तपमानाचा पारा गुरुवारी (दि.२०) ९.३ अंशांपर्यंत वर सरकला असला तरी गुरुवारी थंडीची तीव्रता जाणवत होती.
बुधवारी पारा अचानकपणे ९.५ अंशांवरून थेट ७.९ अंशांपर्यंत खाली घसरला. गेल्या वर्षी डिसेंबरच्या २९ तारखेला ७.५ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले होते. ७.९ ही हंगामातील सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली आहे. गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी थंडीचा कडाका अधिक आहे. उत्तर भारतात आलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम उत्तर महाराष्टÑातील शहरांवरही होऊ लागला आहे. मागील दहा दिवसांपासून नाशिककर वाढत्या थंडीने गारठले असून, तापमानाचा पारा सातत्याने दहा अंशांच्या जवळपास स्थिरावत होता; मात्र सोमवारपासून पारा अधिक वेगाने खाली येऊ लागल्याने थंडीची तीव्रता अधिकच वाढली आहे. दिवसभर नागरिकांना बोचºया थंड वाºयाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिक दिवसभर उबदार कपडे परिधान करून बोचºया वाºयापासून बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे. थंडीचा कडाका वाढताच शहरात सर्दी-पडशासह तापाचे रुग्णही वाढले आहेत. एकूणच वाढत्या थंडीचा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होताना दिसून येत आहे. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी थंडीपासून नागरिकांना अल्पसा दिलासा मिळाला असला तरी संध्याकाळी साडेपाच वाजेनंतर वातावरणात गारवा जाणवू लागला होता. पहाटेही थंडीची तीव्रता चांगलीच होती. यामुळे उबदार कपडे परिधान करून चाकरमान्यांनी कार्यालयात वावरणे पसंत केले. आठवडाभरापासून वाढलेल्या थंडीच्या कडाक्यामुळे नाशिककरांनी सध्या पंखे, वातानुकूलित यंत्रांना सुटी दिली आहे.
गुरुवारी राज्यात सर्वाधिक कमी किमान तापमान अहमदनगरमध्ये ६.४ इतके नोंदविले गेले. औरंगाबाद ८.०, नागपूर ८.६, पुण्यात ८.८, जळगाव ९.०, परभणी ९.९, चंद्रपूर १०.२, सातारा १०.९, उस्मानाबाद १०.२, बुलढाणा १०.८ इतके किमान तापमान नोंदविले गेले. राज्यातील या शहरांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे.

Web Title: Cold wave prevails in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.