थंडीच्या कडाक्याने द्राक्ष उत्पादकांना हुडहुडी हवामानाचा फटका : द्राक्षमण्यांना तडे, भुरी रोग वाढण्याची भीती; बागा वाचविण्यासाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 01:08 AM2017-12-20T01:08:17+5:302017-12-20T01:08:44+5:30

निफाड तालुक्यात थंडीचा जोर वाढल्याने मंगळवारी पारा १० अंशावर आला आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदार वाढत्या थंडीने द्राक्षमण्यांना तडे व भुरी रोग वाढण्याच्या भीतीने धास्तावले आहेत.

The cold weather conditions of the grape growers by the cold of the winter: the vulnerability of the plants, the fear of growing brownie disease; The struggle to save the garden | थंडीच्या कडाक्याने द्राक्ष उत्पादकांना हुडहुडी हवामानाचा फटका : द्राक्षमण्यांना तडे, भुरी रोग वाढण्याची भीती; बागा वाचविण्यासाठी धडपड

थंडीच्या कडाक्याने द्राक्ष उत्पादकांना हुडहुडी हवामानाचा फटका : द्राक्षमण्यांना तडे, भुरी रोग वाढण्याची भीती; बागा वाचविण्यासाठी धडपड

googlenewsNext

सायखेडा : निफाड तालुक्यात थंडीचा जोर वाढल्याने मंगळवारी पारा १० अंशावर आला आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदार वाढत्या थंडीने द्राक्षमण्यांना तडे व भुरी रोग वाढण्याच्या भीतीने धास्तावले आहेत. अनेक काळी द्राक्ष देण्यासाठी तयार झाली असली तरी सतत बदलत असलेल्या हवामानामुळे पीक शेवटच्या टप्प्यात धोक्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी ओखी वादळाच्या तडाख्यातून शेतकरी कसाबसा सावरत असतानाच दोन दिवसांपासून थंडी वाढली आहे. थंडीसोबत कधी ढगाळ तर कधी वारा असा वातावरणात सतत बदल होत आहे. त्यामुळे वाढत्या थंडीने द्राक्ष बागांवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शिवाय मणी फुगवण थांबली आहे. जे प्लॉट देण्यासाठी आले आहे, त्यांना वाढत्या थंडीने तडे जात असल्याने शेतकºयांच्या तोंडाजवळ आलेला घास निसर्ग हिरावून नेतोय का अशी चिंता व्यक्त केली जात आहे. ढगाळ वातावरणामुळे कांदा, पालेभाज्या, फळभाज्या यांच्यावर मावा, अळी, करपा या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पिकांची वाढ होत नाही, शेतात उभे पीक करपा रोगामुळे वाया जाण्याची शक्यता असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. द्राक्ष बागायतदार शेतकºयांनी पीक वाचविण्यासाठी कसरतीमुळे लाखो रुपये खर्च वाढत असूनही बाग वाचविणे जिकिरीचे झाले आहे.

Web Title: The cold weather conditions of the grape growers by the cold of the winter: the vulnerability of the plants, the fear of growing brownie disease; The struggle to save the garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी