थंडीचा कहर; पंधरवड्यापासून नाशिककर हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 12:54 AM2018-12-30T00:54:00+5:302018-12-30T00:54:35+5:30

पंधरवड्यापासून नाशिककर कडाक्याची थंडी अनुभवत आहेत. किमान तापमानाचा पारा सातत्याने घसरत असल्यामुळे थंडीने शहरासह जिल्ह्यात कहर केल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

Cold weather; From fortnight to Nashik, Haren | थंडीचा कहर; पंधरवड्यापासून नाशिककर हैराण

थंडीचा कहर; पंधरवड्यापासून नाशिककर हैराण

Next

नाशिक : पंधरवड्यापासून नाशिककर कडाक्याची थंडी अनुभवत आहेत. किमान तापमानाचा पारा सातत्याने घसरत असल्यामुळे थंडीने शहरासह जिल्ह्यात कहर केल्याने नागरिक हैराण झाले आहेत. शनिवारी (दि.२९) या हंगामातील सर्वाधिक नीचांकी ५.१ इतके किमान तापमान नोंदविले गेले. थंडीचा कडाका वाढल्याने नागरिक दिवस-रात्र अंगावर उबदार कपडे परिधान करून ठेवणे पसंत करत आहेत.
यावर्षी पर्जन्यमानाचे प्रमाण अल्प राहिले असले तरी थंडीचा कडाका मात्र मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी अधिकच वाढला आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात किमान तापमानाचा पारा पाच अंशांपर्यंत घसरला होता. ११ जानेवारी २०१७ रोजी ५.८ इतके नीचांकी तापमान त्या हंगामात नोंदविले गेले होते. मात्र चालू वर्षी डिसेंबरअखेर पारा ५ अंशांपर्यंत घसरला आहे. गेल्या वर्षाची नोंद मागे पडली असून, ५.१ ही यावर्षी हंगामातील नीचांकी नोंद ठरली. उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरींचा परिणाम उत्तर महाराष्टÑातील वातावरणावर झाला आहे. त्यामुळे नाशिक गारठले असून, निफाड तालुका गोठलाही आहे. द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाºया नाशिकमधील बागायतदार थंडीच्या कडाक्यामुळे चांगलेच धास्तावले आहे. शुक्रवारी दिवसभर वातावरणात गारठा कायम होता. तसेच थंड वाºयाचा वेगदेखील अधिक राहिल्यामुळे दिवसभर ऊन पडून न पडल्यासारखेच होते. परिणामी वातावरणात उष्मा निर्माण होऊ शकला नाही. सूर्यास्तानंतर पुन्हा थंड वारे अधिक वेगाने वाहू लागल्याने मध्यरात्रीपर्यंत थंडीचा कडाका अधिकच वाढला होता.
चार वर्षांत प्रथमच पारा ५ अंशांवर
गेल्या चार वर्षांमध्ये प्रथमच किमान तापमान ५ अंशांपर्यंत खाली आले. त्यामुळे ५.१ ही नोंद या चार वर्षांतील नीचांकी ठरली. ६ जानेवारी २०१३ रोजी शहराचे किमान तापमान ४.४ तर ९ फेब्रुवारी २०१२ रोजी २.७ अंश, तर ७ जानेवारी २०११ रोजी ४.४ अंशांवर पारा घसरला होता. एकूणच २०१४ पासून सर्वाधिक थंडीचा कडाका यावर्षी जाणवत आहे.
सर्दी-तापाचे रुग्ण वाढले
थंडीचा वाढता कडाका नागरिकांना असह्य होऊ लागला आहे. वाढत्या थंडीच्या तीव्रतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. सरकारी-खासगी रुग्णालयांमध्ये सर्दी-पडसे, थंडी-तापाचे रुग्ण पुन्हा वाढल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे वापरण्यास प्राधान्य द्यावे. थंड खाद्यपदार्थ खाणे टाळावे. जास्त रसदार फळेदेखील आहारात खाऊ नये. पाणी उकळून प्यावे, अशा उपाययोजना शहरातील डॉक्टरांनी सुचविल्या आहेत.
शहराचे किमान तापमान असे (अंशात)
दिनांक कमाल किमान
२० डिसेंबर २७.१ ९.३
२१ डिसेंबर २९.० ८.३
२२ डिसेंबर ३०.१ ९.६
२३ डिसेंबर ३०.० ११.२
२४ डिसेंबर ३०.२ १२.३
२५ डिसेंबर ३०.३ १४.३
२६ डिसेंबर २६.६ १२.६
२७ डिसेंबर २५.४ ५.७
२८ डिसेंबर २३.९ ६.९
२९ डिसेंबर २५.३ ५.१

Web Title: Cold weather; From fortnight to Nashik, Haren

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.