थंडीने वाढविली द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 01:43 PM2020-12-22T13:43:25+5:302020-12-22T13:43:33+5:30
लासलगाव : निफाड तालुक्यात मंगळवार दि २२ रोजी पारा ६.५ अंशापर्यंत घसरल्याची नोंद कुंदेवाडी येथील गहु संशोधन केंद्रावर करण्यात आली. रब्बीसाठी पोषक हवामान होत असले तरी द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखी वाढली आहे.
लासलगाव : निफाड तालुक्यात मंगळवार दि २२ रोजी पारा ६.५ अंशापर्यंत घसरल्याची नोंद कुंदेवाडी येथील गहु संशोधन केंद्रावर करण्यात आली. रब्बीसाठी पोषक हवामान होत असले तरी द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखी वाढली आहे. उत्तरेकडील राज्यात बर्फवृष्टी होत असल्याने किमान तापमान उणे झाले आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे विश्रांती घेतलेल्या थंडीचे जोरदार आगमन झाले आहे. राज्यातील तापमानात घसरण होत या हंगामातील किमान तापमानाची ८.२ अंश सेल्सिअसची नोंद सोमवारी दि २१ रोजी निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथे झाली होती. मंगळवार रोजी पारा थेट ६.५ अंशावर घसरला आहे. कडाक्याच्या थंडीने तालुका गारठल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून नागरिकांनी उब मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. हरभरा व गव्हाच्या पिकाला या थंडीचा फायदा होणार आहे. द्राक्ष हंगाम ऐन भरात येणार आहे अशा परिस्थीतीत थंडीने द्राक्षमन्यांना तडे जाण्याची भिती निर्माण झाली आहे. द्राक्षवेलीच्या मुळ्या बंद पडणे, द्राक्षघडाचा विकास खुंटणे असे धोके या थंडीमुळे निर्माण झाले आहे. पुढील काही दिवसात पारा घसरण्याचे संकेत मिळाले आहेत. तपमानात घट होत असल्याचा द्राक्षबागांना मोठा धोका आहे. द्राक्षबागेतील मुळ्यांचे कार्य सुरळीत राहुन मण्यांना तडे जाऊ नये याकरिता पहाटे पासुन सुर्योदयापर्यंत ठिबक सिंचनद्वारे पाणी देण्याबरोबरच परिपक्व द्राक्षमण्यांना तडा जाऊ नये याकरिता द्राक्षबागेत शेकोटीद्वारे धुर करुन उष्णता निर्माण करावी लागत आहे. यातुन द्राक्षमालावरील धोके टाळण्याचा उत्पादक प्रयत्न करत आहेत.