कोकणगावी कादवावरील बंधा-याची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 04:43 PM2019-06-26T16:43:29+5:302019-06-26T16:44:29+5:30
शेती संकटात : दुरुस्तीकडे पाटबंधारे खात्याचे दुर्लक्ष
कोकणगाव : शेती आणि पिण्यासाठी पाणी अशा दुहेरी उपयोगासाठी म्हणून सुमारे तीस वर्षापूर्वी कादवा नदीवर बांधण्यात आलेल्या कोकणगावच्या बंधा-याची मोठ्या प्रमाणात पडझड होऊन दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या बंधा-यात पाणी साठून राहत नसल्याने या बंधा-यावर अवलबूंन असलेला शेती व्यवसाय संकटात सापडला आहे. बंधा-याच्या दुरुस्तीकडे पाटबंधारे खात्याचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे.
कादवा नदीवरील बंधा-याच्या दुरु स्तीसाठी परिसरातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी संबंधित प्रशासनाकडे तक्र ार करून देखील ग्रामपंचायत आणि पाटबंधारे विभागाने कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. परिणामी नादुरु स्त असलेला बंधारा फेब्रुवारी महिन्यातच कोरडा ठाक पडला होता. त्यामुळे येथील शेतक-यांना द्राक्षे तसेच रब्बी हंगामातील पिकांवर ऐन पाणी सोडावे लागले. त्याचबरोबर त्यावर अवलंबून असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरींना पुरेसे पाणी मिळत नाही. तीन-चार वर्षापासून त्याची अधिकच दुरवस्था झाली आहे.सदर बंधा-याची दुरु स्ती लवकरात लवकर करावी अशी मागणी लाभधारक शेतकरी तसेच रामकृष्ण गायकवाड, आण्णासाहेब मोरे, राजेंद्र गायकवाड, विलास गायकवाड, शरद गायकवाड, गोविंद मोरे, विश्वास मोरे, गणपत मोरे, शरद मोरे, विनायक मोरे, दिलीप मोरे अतुल मोरे आदींनी केली आहे.