एकलहरे ग्रामस्थांनी घेतली कचरा, प्लॅस्टिक मुक्तीची सामुहिक शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 05:19 PM2018-09-06T17:19:40+5:302018-09-06T17:21:04+5:30
एकलहरे : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत एकलहरे ग्रामस्थांनी कचरा व प्लॅस्टिक मुक्तीची सामुहिक शपथ घेतली.
एकलहरे कॉलनी, सिध्दार्थनगर, एकलहरे गाव परिसरात कचरामुक्ती व प्लॅस्टिक मुक्तीच्या जनजागृतीसाठी विद्यार्थी, रहिवासी, युवा कार्यकर्ते, महिला यांच्या वतीने प्रभातफेरी काढण्यात आली होती. यावेळी व्यापारी वर्गाला प्लॅस्टिक बंदीबाबत सूचना करण्यात आल्या.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी भाऊसाहेब जगताप, ग्रामविकास अधिकारी एस.जी.वाघ, सरपंच मोहिनी जाधव यांनी उपस्थितांना कचरा व प्लॅस्टीक मुक्तीची शपथ दिली.
यावेळी उपसरपंच अशोक पवळे, ग्रामपंचायत सदस्य वैशाली धनवटे, निलेश धनवटे, विश्वनाथ होलीन, निर्मला इंगळे, कांताबाई पगारे, सुरेखा जाधव, रूपाली कोकाटे, संजय ताजनपुर, श्रीराम नागरे, जयदेव वायदंडे, सुरेश निंबाळकर, शोभा वैद्य, मुक्ता दुशिंग, शोभा म्हस्के, निर्मला जावळे, रत्ना सोनवणे, मुख्याध्यापक आर एल. अलगट, याकोब कुवर, जगदीश अहिरे, एम.के. वाघ आदि उपस्थित होते.