१ लाख १६ हजार गणेशमूर्तींचे संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:59 AM2018-09-25T00:59:54+5:302018-09-25T01:00:36+5:30

गणेश विसर्जनानिमित्त महापालिकेच्या वतीने सहाही विभागांमध्ये ठिकठिकाणी कृत्रिम तलाव व गणेशमूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले होते. यावर्षीदेखील महापालिकेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

 Collection of 1 lakh 16 thousand Ganesh idols | १ लाख १६ हजार गणेशमूर्तींचे संकलन

१ लाख १६ हजार गणेशमूर्तींचे संकलन

Next

नाशिक : गणेश विसर्जनानिमित्त महापालिकेच्या वतीने सहाही विभागांमध्ये ठिकठिकाणी कृत्रिम तलाव व गणेशमूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले होते. यावर्षीदेखील महापालिकेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शहरात एकूण १ लाख १६ हजार ८९६ मूर्ती व ११४.४५ टन इतके निर्माल्य संकलन झाले. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी ५३ हजाराने मूर्ती संकलनामध्ये घट झाली आहे.  पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी महापालिका व विविध सामाजिक स्वयंसेवी संस्थांसह शाळा, महाविद्यालयांमधून आवाहन केले जात होते. निर्माल्य, मूर्ती संकलनासाठी विविध स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेत महापालिके ला सहकार्य केले. पर्यावरणपूरक उत्सवासाठी नाशिककरांमध्ये कमालीची जनजागृती होत असली तरी यावर्षी ५३ हजाराने मूर्ती संकलन कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. गावठाण परिसर असलेल्या नाशिक पूर्व व नाशिकरोड या विभागांमध्ये अन्य चार विभागांच्या तुलनेत मूर्ती संकलनास कमी प्रतिसाद लाभला.
गोदाकाठ, तपोवन, सोमेश्वर, नासर्डीकाठ, गंगापूररोड, टाकळी, दसक, विहितगाव, देवळाली गाव, सातपूर, सिडको, इंदिरानगर, भारतनगर आदी ठिकाणी महापालिकेच्या वतीने मूर्ती, निर्माल्य संकलन केंद्र उभारण्यात आले होते. तसेच शहरातील या भागांमध्ये बहुतांश स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेत मूर्ती संकलनाला हातभार लावल्याचे चित्र पहावयास मिळाले.
अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर शहरातील पूर्व विभागात ७ हजार १०४, पश्चिममध्ये १३ हजार ४१९, सिडकोमध्ये १३ हजार १४४, सातपूर विभागात ३७ हजार ५२१, नाशिकरोड विभागात ७१५८ तर पंचवटी या गावठाण विभागात सर्वाधिक ३८ हजार ५५० मूर्तींचे संकलन करण्यास महापालिका प्रशासनाला यश आले. यासाठी विभागनिहाय एकूण ६८ वाहने उपलब्ध क रून देण्यात आली होती.
अमोनिअम बायकार्बोनेटचा पुरवठा
महापालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नागरिकांना एकूण ४.२ टन इतक्या अमोनिअम बायकार्बोनेट पावडरचा मोफत पुरवठा करण्यात आला. या पावडरचा वापर नागरिकांनी विविध सोसायट्यांसह घरगुती गणेश विसर्जनासाठी केला. या पावडरमुळे मूर्ती विरघळण्यास मदत झाली.
महापालिकेने संकलित झालेल्या मूर्ती, निर्माल्याची वाहतूक करण्यासाठी विभागनिहाय वाहनेही उपलब्ध करून दिली होती. तसेच कृत्रिम तलाव निर्मितीसाठी लोखंडी पात्रांचा केंद्रांवर पुरवठा केला होता. त्यामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणात सोय झाली होती.

Web Title:  Collection of 1 lakh 16 thousand Ganesh idols

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.