‘स्वप्नपुर्ती’च्या स्वयंसेवकांकडून गोदाघाटावर ४ हजार गणेश मुर्तीचे संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 02:30 PM2020-09-02T14:30:59+5:302020-09-02T14:32:47+5:30

स्वयंसेवकांनी यावेळी जलप्रदूषण, नदीप्रदूषणाबाबत जनजागृतीवरदेखील भर दिला. यावेळी भाविकांकडून आणण्यात आलेल्या निर्माल्याचेही संकलन करण्यात आले.

Collection of 4000 Ganesh idols at Godaghata by the volunteers of 'Swapnapurti' | ‘स्वप्नपुर्ती’च्या स्वयंसेवकांकडून गोदाघाटावर ४ हजार गणेश मुर्तीचे संकलन

‘स्वप्नपुर्ती’च्या स्वयंसेवकांकडून गोदाघाटावर ४ हजार गणेश मुर्तीचे संकलन

Next
ठळक मुद्देसायंकाळी ६ वाजेपर्यंत गोदाकाठावर मुर्ती संकलनाचे कार्य

नाशिक : सालाबादप्रमाणे स्वप्नपुर्ती फाउण्डेशनच्या स्वयंसेवकांनी आपल्या सामाजिक व पर्यावरणपुरक उपक्रमात खंड न पडू देता यावर्षीही कोरोनाकाळातसुध्दा गोदाघाटावर दिवसभरात ४ हजार २०० गणेशमुर्तींचे संकलन करत महापालिका प्रशासनाकडे त्या सुपुर्द केल्या. यावर्षी फाउण्डेशनकडून मोजक्याच तरुण स्वयंसेवकांना यासाठी बोलविण्यात आले होते. तोंडावर मास्क, फेसशिल्ड आणि हातात ग्लोज परिधान करत सॅनिटायझरचा वेळोवेळी वापर क रुन गोदामाईच्या पात्रात गणेशमुर्ती जाणार नाही, याची खबरदारी घेत भाविकांना आवाहन करत मुर्तींचे दान घेतले.
सकाळी १०वाजेपासून तर सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुर्ती संकलनाचे कार्य गोदाकाठावर स्वयंसेवकांकडून सुरु होते. यामध्ये संस्थेचे अध्यक्ष सचिन काकडे, अथर्व पाटील, तेजस कांगणे, आकाश कोकाटे, हर्षल शेलार, निखिल लाहोटी या मोजक्याच स्वयंसेवकांकडून कोरोनाबाबतच्या शासनाकडून प्राप्त झालेल्या सर्व खबरदारीच्या उपाययोजनांचे पालन करत मनपाच्या मुर्ती संकलन मोहिमेला हातभार लावण्यात आला. दिवसभरात ४ हजार २०० नागरिकांनी त्यांच्या मुर्ती दान करण्याच्या साद ला दाद दिली.
स्वयंसेवकांनी यावेळी जलप्रदूषण, नदीप्रदूषणाबाबत जनजागृतीवरदेखील भर दिला. यावेळी भाविकांकडून आणण्यात आलेल्या निर्माल्याचेही संकलन करण्यात आले. संस्थेचे हे पाचवे वर्ष होते. मनपाने आॅनलाईन गणेश विसर्जनाची सुविधा नाशिककरांना दिल्याने या वेळेस गर्दी आणि गोंधळ झाला नसल्याचे काकडे यांनी सांगितले.

Web Title: Collection of 4000 Ganesh idols at Godaghata by the volunteers of 'Swapnapurti'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.